Pune Crime News : 307 चा बदला 302 ने; पुण्यातील थिएटरबाहेर हत्येचा थरार, तलवारीने हल्ला करत तरुणाला संपवलं

Pune mangala Theatre crime news : नितीन म्हस्के असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
Pune Shivajinagar Police station
Pune Shivajinagar Police stationSaam TV

अक्षय बडवे

Pune News : पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वरवर जाताना दिसत आहे. गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली की नाही असा प्रश्न उपस्थित करणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे. पुण्यातील मंगला टॉकीजबाहेर हत्येची थरारक घटना समोर आली आहे. १०-१२ जणांनी मिळून तरुणांना तलवारीने हल्ला करत तरुणाची हत्या केली आहे.

नितीन म्हस्के असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगला टॉकीज बाहेर रात्री १ वाजेच्या सुमारास ही हत्येची घटना घडली. पूर्ववैमान्यासातून तलवार, लोखंडी गज, काठ्या डोक्यात घालून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सागर कोळणटी, मलिक कोल्या, इम्रान शेख, पंडित कांबळे, विवेक नवघर, लॉरेन्स पिल्ले, सुशील सुर्यवंशी, बाबा आवले, आकाश गायकवाड अशी आरोपींची नावं आहे. (Crime News)

Pune Shivajinagar Police station
Vashi Attack On Boy: प्रेमसंबंधाला विरोध, भावाचा बहिणीच्या प्रियकरावर प्राणघातक हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन म्हस्के याचे काही दिवसांपूर्वी कोरेगाव पार्कमध्ये या आरोपींसोबत कुठल्यातरी कारणावरून भांडणे झाली होती. यावेळी म्हस्के याने आरोपीपैकी एकावर हल्ला केला होता. याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी म्हास्केचा खून करायचे ठरवले. (Maharashtra News)

Pune Shivajinagar Police station
Rain Forecast in Maharashtra : राज्यात गायब झालेला पाऊस उद्यापासून पुन्हा सक्रीय होणार; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

नितीन म्हस्के हा काल रात्री पुण्यातील मंगला टॉकीजमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आला होता. चित्रपट रात्री १ वाजता संपल्यानंतर म्हस्के बाहेर पडला आणि त्यावेळी १० ते १२ जणांनी त्याला घेरलं. (Latest Marathi News)

हातात असलेल्या तलवार, पालघन, काठ्या, लोखंडी गज याचा वापर करत आरोपींनी म्हस्के वर सपासप वार केले. वार करून हे सर्व त्या ठिकाणाहून फरार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या म्हस्केचा यामध्ये मृत्यू झाला.अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com