Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News : मध्यरात्री पावसाचा जोर वाढला, परळीत कार पुराच्या पाण्यात गेली वाहून, पाहा थरारक व्हिडिओ

Beed Parali News : बीडच्या परळी तालुक्यातील कौडगावाजवळ मुसळधार पावसामुळे कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. चार तरुणांपैकी तिघांना वाचवण्यात यश आले असून एक तरुण अद्याप बेपत्ता आहे.

Alisha Khedekar

  • परळीतील कौडगावाजवळ कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्घटना रविवारी मध्यरात्री घडली.

  • कारमधील चौघांपैकी तिघांना सुखरूप वाचवण्यात आले, तर एक तरुण बेपत्ता आहे.

  • एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू आहे.

  • मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील नाले-ओढे धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात रविवारी मध्यरात्री एक मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात कौडगाव हुडा गावाजवळ एक कार वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. कारमध्ये चार तरुण प्रवास करत होते. त्यापैकी तिघांना वाचविण्यात प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांना यश आले आहे. मात्र, एक तरुण अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सदर घटना रात्री अकरा ते बाराच्या सुमारास घडली. परळीच्या ममदापूर-बोरखेड मार्गावरील कौडगाव हुडा गावाजवळील लहानशा ओढ्याने नदीचे स्वरूप घेतले. पुलावरून जाताना चारचाकी गाडीला पुराच्या पाण्याचा जोरदार लोट बसला आणि ती गाडी क्षणात वाहून गेली. वाहनातील तरुणांना सुरुवातीला धोका लक्षात आला नाही. त्यांनी पाण्याचा अंदाज कमी करून गाडी पुलावर चढवली, मात्र काही क्षणांतच ती कार पाण्याच्या वेगवान प्रवाहात अडकली आणि वाहून गेली.

प्रसंगावधान राखून गाडीतून बाहेर पडण्याचा त्यांनी केला. त्यापैकी तिघा तरुणांनी तातडीने कारमधून उडी मारली आणि जवळच असलेल्या झाडाला धरून आपले प्राण वाचवले. प्रशासनाच्या मदतीने अमर पौळ (२५) आणि राहुल पौळ (३०, दोघे रा. डिग्रस) तसेच राहुल नवले (२३, रा. पुणे) यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, विशाल बल्लाळ (रा. पुणे) हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला असून तो अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध पोलिस, स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून रात्रीपासून सुरूच आहे.

पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान असल्याने बचावकार्य अत्यंत कठीण झाले आहे. रात्रीपासूनच सिरसाळा पोलिस ठाण्याचे ठाणेप्रमुख दहीफळे, एसडीओ, डीवायएसपी, तहसीलदार यांच्यासह स्थानिक पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एनडीआरएफला तातडीने कळवून बचाव मोहिम सुरू केली आहे.

या गंभीर घटनेनंतर परळी मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. त्यांनी मध्यरात्रीच विभागीय आयुक्त पापळकर आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर पुणे येथून एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. याशिवाय आवश्यक असल्यास एसडीआरएफची टीम किंवा हेलिकॉप्टरदेखील मदतीसाठी पाठविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुंडे यांनी दिली.

स्थानिक सरपंच सुभाष नाटकर, कार्यकर्ते राजाभाऊ पौळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित राहून प्रशासनाला मदत करत आहेत. मुसळधार पावसामुळे शोधमोहीमेत अनेक अडथळे निर्माण होत असले तरी गावकरी आणि बचाव पथक जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध लवकर लागावा यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि नातेवाईक प्रार्थना करत आहेत. मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील अनेक नद्या, ओढे आणि नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

Maharashtra Rain Live News: ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांनाही सुट्टी

Airtel Prepaid: Airtel कडून यूजर्सना सरप्राईज ऑफर! एअरटेल प्रीपेड ग्राहकांना Apple Music मोफत उपलब्ध

Rain Update: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT