Heavy Rains in Maharashtra: Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Rain : महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होणार का? जाणून घ्या सरकारचे A टू Z निकष

Heavy Rains in Maharashtra: महाराष्ट्रात मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालं आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याचे सरकारचे A टू Z निकष, पर्जन्यमानाचे विचलन, पिकांचे नुकसान आणि पंचनामे याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

Namdeo Kumbhar, Ganesh Kavade

  • महाराष्ट्रातील १९१ तालुक्यांमध्ये खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

  • पर्जन्यमानाचे विचलन, पिकांचे पंचनामे आणि इतर निकष पाहून ओला दुष्काळ जाहीर केला जातो.

  • मराठवाडा, कोकण आणि विदर्भात पूल वाहून जाणे, रस्ते खचणे, जनावरे वाहून जाणे अशा घटना घडल्या.

  • सरकार लवकरच नुकसानग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करून मदत योजना सुरू करण्याची शक्यता.

Maharashtra Declare Wet Drough Latest Marathi News : गेल्या काही दिवसांत पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडला. मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, धाराशिव, संभाजीनगर, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर आणि विदर्भातील अमरावती, नाशिक येथे जोरदार पाऊस पडला. विशेषतः गेल्या आठवड्यात मराठवाड्यात अति प्रमाणात नुकसान झाले. शेतात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले, त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. डांबरी रस्ते खचले, पूल वाहून गेले आणि नद्या-नाले दुथड्या भरून वाहिल्या. त्यामुळे जिथे अति प्रमाणात नुकसान झालेय, त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जातेय. फडणवीस सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडला आहे त्याठिकाणी ओला दुष्काळ जाहीर होणार असे सांगितलेय. पण ओला दुष्काळ नेमका कसा जाहीर होतो? त्याचे निकष काय आहेत? ओला दुष्काळ कोण जाहीर करतं? याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊयात... त्याआधी किती ठिकाणी नुकसान झाले हे पाहूयात..

राज्यातील १९१ तालुक्यांमध्ये ६५४+ महसूल मंडळांतील खरीप पिकांना (भात, सोयाबीन, जिरायती, बागायती, फळपिके) मोठा फटका बसला. मराठवाड्यात एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले आहेत. शेतात पाणी साचले आणि पिके वाया गेली. कोकणात भातपीक धोक्यात आले आहे. रस्ते, पूल, घरांमध्ये पाणी साचणे, जनावरे वाहून जाणे आणि वाहनांचे खराब होणे. बीडच्या आष्टी तालुक्यात पूल कोसळला. पुण्यातील लोणीमध्ये घरात पाणी घुसले. सोलापूरमध्ये शेतात जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे. मृतांचीसंख्या स्पष्ट नाही, पण रिपोर्ट्सनुसार, ऑगस्ट अन् सप्टेंबर या दोन महिन्यात १५ ते २० जणांचा पावसामुळे मृत्यू झाला आहे. त्याशिवाय शेकडो जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. पंचनामे सुरू आहेत आणि अनेक ठिकाणी अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत.

वेगवेगळ्या राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी वेगवेगळी कार्यपध्दती अवलंबिवण्यात येत आहे. शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ११ व १२ मध्ये राज्यात दुष्काळ जाहीर करण्याचे निकष व दुष्काळ जाहीर करण्याची पध्दती विहित करण्यात आली आहे. सदर निकष व कार्यपध्दती केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहिता २००९ मधील तरतुदीनुसार विहित करण्यात आली आहे. सध्याच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठी आणेवारी/पैसेवारी/ग्रीडवारी ही पध्दत व नजर पाहणी आणि पीक कापणी प्रयोगामध्ये दिसून आलेल्या नुकसानीच्या अंदाजावरून दुष्काळ जाहीर करण्यात येतो. केंद्र शासनाने आता दुष्काळ व्यवस्थापन संहिता २००९ मध्ये सुधारणा करून सुधारित दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ प्रकाशित केली आहे. पाहूयात नेमके निकष काय आहेत..

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रामुख्याने पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक व पिकांचे क्षेत्रिय सर्वेक्षण/सत्यापन विचारात घेण्यात येतात.

अनिवार्य निर्देशांक (Mandatory Indicators)

अ) पर्जन्यमानाशी निगडीत निर्देशांक -:

1) पर्जन्यमानाचे विचलन (Rainfall Deviation)

ii) पर्जन्यमानातील खंड पर्जन्यमानात ३ ते ४ आठवडे खंड पडल्यास

iii) जून व जूलै या महिन्यांमध्ये एकूण सरासरी पर्जन्याच्या ५०% पेक्षा कमी पाऊस झाला असल्यास दुष्काळाची प्रथम कळ (Trigger-१) लागू होईल.

iv) जून ते सप्टेंबर या मान्सून कालावधीतील सरासरी पर्जन्यमान ७५% पेक्षा कमी असल्यास तरीदेखील दुष्काळाची प्रथम कळ (Trigger-१) लागू होईल.

वर्तमान पर्जन्य - सरासरी पर्जन्य)

पर्जन्यमानाचे विचलन (RFdev) = _____________________________x १००

सरासरी पर्जन्य

(पर्जन्यमान मिलीमीटरमध्ये)

वर्तमान व सरासरी पर्जन्याची आकडेवारी विचारात घेताना ती सारख्याच कालावधीची असावी. उदा. जून अखेरचे पर्जन्यमानाचे विचलन काढताना जून महिन्या अखेरचे वर्तमान कालावधीतील एकूण पर्जन्य व जून महिन्या अखेरचे सरासरी पर्जन्य विचारात घ्यावे. तसेच जूलै अखेरचे पर्जन्यमानाचे विचलन काढताना जून व जूलै अखेरचे वर्तमान कालावधीतील एकूण पर्जन्य व जूलै अखेरचे सरासरी पर्जन्य विचारात घ्यावे.

मान्सून सुरू झाल्यानंतर जून महिन्याच्या अखेरपासून प्रत्येक महिन्याचे पर्जन्यमानाचे विचलन परिगणित करण्यात यावे. पर्जन्यमानाचे विचलन हे तालुकानिहाय काढण्यात यावे. जून महिन्यापासूनचे पर्जन्यमानाचे विचलन काढताना तालुकानिहाय काढण्यात यावे. याकरिता मदत व पुनर्वसन विभागाने शासन निर्णय, दिनांक १८.३.२००६ अन्वये निश्चित केलेले सरासरी पर्जन्य विचारात घ्यावे. वर्तमान पर्जन्यमानाची आकडेवारी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून तालुकानिहाय प्राप्त करून घ्यावी.

201710071658182119.pdf
Preview

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तळोद्यात 2 हजार चारशे रुपयांची लाच घेताना कनिष्ठ लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

Deepika Padukone: आधी 'स्पिरिट' आता 'कल्की 2'; दीपिका पदुकोणची आणखी एका मोठ्या चित्रपटातून एक्झिट

Marutiच्या गाड्या लाखांनी स्वस्त होणार, S-Presso ते Wagon R कारच्या किंमतीत मोठी कपात, वाचा यादी

Shirdi Saibaba : साई प्रसादालयात आता साई आमटीचा प्रसाद; दर गुरुवारी भाविकांना मिळणार लाभ

Madhura Joshi: गुलाबी साडी अन् ओठावर लाली, मधुराच्या सौंदर्याची भलतीच चर्चा

SCROLL FOR NEXT