Mumbai Mayor : खान की मराठी, मुंबईचा महापौर कोण? राजकारण पेटलं, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

BJP vs Shiv Sena clash over Mumbai mayor community row : मुंबई महापौर कोणत्या समाजाचा असावा या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण पेटलं आहे. भाजपचे अमित साटम यांच्या विधानावरून शिवसेना, मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.
bmc news
Political war erupts in Mumbai over mayor’s community row as BJP, Shiv Sena, and MNS leaders clash.Saam Tv
Published On
Summary
  • मुंबई महापौर कोणत्या समाजाचा असावा या प्रश्नावरून मोठा वाद उभा राहिला.

  • भाजप नेते अमित साटम यांच्या विधानावरून शिवसेना व मनसे आक्रमक झाले.

  • संजय राऊत यांनी महापौर मराठीच होईल असा दावा केला.

  • मनसेचे संदीप देशपांडे व भाजपचे नवनाथ बन यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिली.

Mumbai mayor controversy 2025 latest update : महाराष्ट्रामध्ये पाच वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेय. कोर्टाच्या आदेशानंतर निवडणुका कधी होणार, यावर शिक्कामोर्तब झाले अन् प्रत्येक राजकीय पक्षाने आपली तयारी सुरू केली. मुंबईसाठी भाजप अन् ठाकरे पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकाचा महपोर नेमका कोणत्या समाजाचा असणार यावर सध्या चर्चा रंगली आहे.

उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत जवळीक साधली आहे. भाजपकडूनही ठाकरेंवर हल्ले चढवले जात आहेत. वरळी डोम येथे भाजपच्या कार्यक्रमात अमित साटम यांनी मुंबई महापौरावर वक्तव्य करत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. मुंबईचा महापौर कोणत्या समाजाचा असेल, यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष साटम यांनी ठाकरेंकडे मुंबईची सत्ता गेली तर महापौर खान असेल असा टोला लगवला. त्याला शिवसेना अन् मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मुंबईच्या महापौरावरून मुंबईतील राजकारण तापलेय. पाहूयात सविस्तर नेमकं काय झालेय?

….तर एखादा 'खान' मुंबईचा महापौर होईल - आमदार अमित साटम

वर्सोवा किंवा मालवणीमध्ये दिसलेल्या पॅटर्नमुळे शहर उद्ध्वस्त होऊ शकते. जर शिवसेना यूबीटी सत्तेत आली तर एक 'खान' या मुंबईचा महापौर होईल. पण आपण ते होऊ देणार नाही.
अमीत साटम, भाजप मुंबई अध्यक्ष
bmc news
Farmer suicide : अधिकाऱ्याची धमकी, पंचनामा सुरू असतानाच शेतकऱ्याची आत्महत्या, संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं? आरिफ मोहम्मद खानांना पदं कुणी दिली? खानाचा तिकटरा असेल तर हसन मुश्रीफ यांना मंत्रि‍पदापासून दूर करा. यासारखी अनेक उदाहरणं मला देता येतील. या देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडण घडणीत भाजप नव्हता. पण मुस्लिम समाज होता. अमित साटम यांनी याबाबत जरा अभ्यास करावा. मुंबईचा महापौर हा मराठी असेल अन् तो शिवसेनेचा असेल, असे संजय राऊत यांनी सांगीतले.

bmc news
नागपूरमध्ये कंत्राटदाराची आत्महत्या, शरद पवारांच्या नेत्याला ठोकल्या बेड्या, विदर्भाच्या राजकारणात खळबळ!

संदीप देशपांडे काय म्हणाले ?

मुंबईचा महापौर हा मराठीच होणार ,खानाची भीती दाखवून भैय्या आणि गुज्जु महापौर करण्याचा कट उधळून लावणार. पतपेढीच्या विजयामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांची कावीळ महापालिका निवडणुकीत उतरणार, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

नवनाथ बन काय म्हणाले ?

मुंबईचा महापौर मराठीच होणार हे आम्हाला कुणाकडून शिकायची गरज नाही. मराठी माणसाच्या हक्कासाठी भाजपने नेहमीच लढा दिला आहे, ते मुंबईतील मराठी माणसाला ठाऊक आहे. आज मुंबईकर मराठी माणूस आत्मविश्वासाने उभा आहे. त्याला भीती दाखवायची गरज नाही, साथ द्यायची गरज आहे. आणि ती साथ फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि भाजप देऊ शकते हे मुंबईकरांना ठाऊक आहे. पतपेढीच्या निवडणुकीत कोण जिंकलं? कोण हळकुंडानं पिवळं झालं? आणि कुणाचा बॅंड वाजला? हे मुंबईकरांनी बघितलं आहे. महापालिका निवडणुकीत मराठी माणूस तुमच्या भावनिक अजेंड्याला बळी पडणार नाही, तर विकासाच्या राजकारणाला मत देणार आहे. आणि त्यामुळेच महापौर मराठीच होईल पण तो मराठी माणूस भाजप-महायुतीचा असेल!

bmc news
Pune Crime : पुणे पुन्हा हादरलं! मध्यरात्री ५ जणांचा गोळीबार, निलेश घायवाळ टोळीकडून फायरिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com