Maharashtra Weather Updates IMD Rain Alert Latest News  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Monsoon 2023: राज्यात मान्सून कधी दाखल होणार? हवामान खात्याने दिली मोठी अपडेट, तारीखही सांगितली

Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार, याबाबत हवामान खात्याने मोठी अपडेट दिली असून तारीख सुद्धा सांगितली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Weather Updates: मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी जाहीर केले. मान्सून केरळमध्ये दाखल होताच राज्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. आता लवकरच हा मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. अशातच हवामान खात्याने मान्सूनबाबत मोठी अपडेट दिली आहे. (Latest Marathi News)

मान्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील ४८ तासांत कर्नाटकात आणि मंगळवार, १३ जूनपर्यंत कोकणात पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ (Cyclone) चक्रीवादळामुळे पावसाचा जोर कमी असणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख १ जून आहे. यंदा ४ जूनपर्यंत पाऊस येईल, असा अंदाज होता. त्यानंतरही चार दिवसांच्या विलंबाने आलेल्या मोसमी पावसाने केरळचा ७५ टक्के आणि तमिळनाडूचा ३५ टक्के भाग व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.  (Breaking Marathi News)

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार?

मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे १३ जूनपर्यंत कोकणात पाऊस (Rain Alert) दाखल होण्याची शक्यता आहे. वाऱ्याच्या वाटचालीस पोषक स्थिती असल्यामुळे पुढील ४८ तासांत वारे कर्नाटकपर्यंत मजल मारतील. त्यानंतर गोव्यात ११ जून आणि १३ जूनपर्यंत कोकणात मोसमी पाऊस पडेल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

गेल्या आठवडाभरापासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. गुरूवारी वर्धा येथे सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी १८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अशातच राज्यात मान्सून दाखल होण्याआधी मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी राज्यभरात पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYCच्या नावाखाली फेक वेबसाइट; नेमकं सत्य काय?

Mumbai News : बोरिवली स्टेशनवर फिल्मी स्टाईल दरोडा, ६ जणांनी लाखो रूपयांवर केला हात साफ

SCROLL FOR NEXT