Cyclone Biporjoy Latest News: सध्या अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. 'बिपरजॉय' नावाचे चक्रीवादळ हळूहळू भारताकडे सरकत आहे. या चक्रीवादळाच्या तडाख्यात चार राज्ये येऊ शकतात असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. एकीकडे मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर असताना अचानक चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. (Latest Marathi News)
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 'बिपरजॉय' या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका हा गुजरातला आहे. याशिवाय त्याचा परिणाम महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातही होण्याची भीती आहे. पुढील ४८ तासांत हे चक्रीवादळ आणखी तीव्र स्वरूप धारण करू शकते, असे सांगण्यात येत आहे.
चक्रीवादळाचा वाढता धोका लक्षात घेता, गुजरातमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यासोबतच राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या 11 पथकांनाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे. (Breaking Marathi News)
हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर मच्छिमारांना खोल समुद्रातून परतण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, 'बिपरजॉय' हे चक्रीवादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रातून हळूहळू उत्तर आणि वायव्येकडे सरकत आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा (Rain Alert) देण्यात आला आहे.
सध्या हे वादळ पोरबंदरच्या नैऋत्येला ९३० किमी अंतरावर आहे. हवामान खात्यानुसार, या वादळामुळे ताशी 135 ते 145 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. ज्याचा परिणाम किनारी भागात होऊ शकतो.
अहमदाबादमधील हवामान विभागाच्या विज्ञान केंद्राचे संचालक मनोरमा मोहंते यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला सांगितले, की “बिपरजॉय या चक्रीवादळामुळे (Cyclone) 10, 11 आणि 12 जून रोजी वाऱ्याचा वेग वाढू शकतो".
वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 नॉट्स वेगाने वाहू शकतो. त्याचबरोबर चक्रीवादळामुळे दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रसह किनारपट्टी भागात हलका पाऊस पडू शकतो. याबाबत सर्व बंदरांना कळविण्यात आले आहे. त्यांना चेतावणी संदेश जारी करण्यास सांगितले आहे." असंही ते म्हणाले.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.