Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? वाचा आजचा भाव

Maharashtra Petrol-Diesel Price Today: पेट्रोल डिझेलचे दर हे जागतिक बाजारपेठेतील कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारभूत असतात.
petrol diesel price today 9 June 2023
petrol diesel price today 9 June 2023Saam TV

Maharashtra Petrol-Diesel Price Today: पेट्रोल डिझेलचे दर हे जागतिक बाजारपेठेतील कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारभूत असतात. गेल्या २४ तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनीही शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले आहेत. (Latest Marathi News)

petrol diesel price today 9 June 2023
Mumbai News: पावसाळ्यासाठी मुंबई सज्ज! आपत्तींचा सामना करण्यासाठी बीएमसीचा 'मेगा प्लान'

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या ताज्या दरानुसार आजही दिल्ली, मुंबईसह देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल (Petrol) ९६.७२ रुपये आणि  डिझेल (Diesel) ८९.६२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. दुसरीकडे मुंबईत पेट्रोलचा दर १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

विशेष बाब म्हणजे, गुरूवारी (८ जून) महाराष्ट्रात (Maharashtra) पेट्रोलच्या दरात 35 पैशांनी कपात करण्यात आली होती. डिझेलही ३५ पैशांनी स्वस्त झाले होते. पंजाबमध्येही पेट्रोल २८ पैशांनी तर डिझेल २७ पैशांनी स्वस्त झाले होते.

petrol diesel price today 9 June 2023
Saamana Editorial : बुडत्यांनी औरंगजेबाचा आधार घेतला असेल तर ते लाजिरवाणेच, सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल १०६.०३ रुपये और डीजल ९२.७६ रुपये प्रति लीटर

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com