Mumbai News: पावसाळ्यासाठी मुंबई सज्ज! आपत्तींचा सामना करण्यासाठी बीएमसीचा 'मेगा प्लान'

BMC Preparation For Monsoon: मुंबईत पूर अलर्ट देणारी आयफ्लोज प्रणाली यंदाच्या पावसाळ्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे.
BMC
BMCSaam TV

BMC iFlows System For Flood Alerts : पावसाळ्यातील आपत्तींचा सामना करण्यासाठी बीएमसीचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. मुंबईत पूर अलर्ट देणारी आयफ्लोज प्रणाली यंदाच्या पावसाळ्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे.

यंदाच्या पावसाळ्यासाठी मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी आयफ्लोज (IFLOWS) प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आणि राष्ट्रीय समुद्रीतट संशोधन केंद्र यांच्यामार्फत संयुक्तरित्या पूर प्रवण क्षेत्राची आगाऊ सूचना देणारी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

यासोबतच नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन कक्षासोबत संपर्क साधण्यासाठीच्या हॉटलाईन्स, आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरता निवारा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक आणि मोबाईल एप यासारख्या सुविधाही नागरिकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून उपलब्ध देण्यात आल्या आहेत. याशिवाय २४ प्रशासकिय कार्यालयांमध्ये ‘विभागीय नियंत्रण कक्ष’ देखील कार्यान्वित करण्यात आले आहेत.

BMC
Cordelia Cruise Case: बहुचर्चित कॉर्डेलिया क्रुझवर आले होते एनसीबीनेच जप्त केलेले अमली पदार्थ? हायकोर्टात याचिका दाखल

‘मान्सुन – २०२३’ सुसज्जतेबाबत बृहन्मुंबई महानगरपलिकेद्वारे सर्वस्तरिय कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने यंदाच्या पावसाळ्यासाठी विविध यंत्रणांसोबत सुसज्जतेसाठी समन्वय साधला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशांनुसार महानगरपालिकेच्या मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये विभागीय नियंत्रण कक्ष प्रथमच स्वतंत्र मनुष्यबळासह सुसज्ज करण्यात आले आहेत. यासोबतच ५८ हॉट लाईन्सची सुविधा ही महानगरपालिकेची २४ प्रशासकीय विभाग कार्यालये, ६ मोठी रुग्णालये व २८ बाह्य यंत्रणांना जोडण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.

मुंबई पोलीसांमार्फत बृहन्मुंबईत बसविण्यात आलेल्या ५३६१ सिसिटीव्ही कॅमे-यांचे थेट प्रक्षेपण पहाण्याकरिता व्हिडीओ वॉलची सुविधा आपत्कालीन कक्षात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आपत्ती प्रसंगी वाहतूक व्यवस्था कोलमडल्यास विविध रेल्वे स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांकरिता, तसेच आपत्तीमुळे बेघर झालेल्या नागरिकांकरिता तात्पुरते आश्रय मिळावा म्हणून निवाऱ्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी दिल्या आहेत.

BMC
Ashadhi Wari 2023: आषाढी वारीसाठी सरकार सज्ज! सार्वजनिक बांधकाम मंत्री करणार पायी मार्गाची पाहाणी

शहर आपत्ती व्यवस्थापन केंद्र येथील बॅकअप नियंत्रण कक्ष

महानगरपालिकेतील मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात काही समस्या उद्भवल्यास समन्वय कार्य अबाधितपणे व्हावे यासाठी पर्यायी नियंत्रण कक्ष (Backup Control Room) परळ परिसरातील साईबाबा मार्गावरील बेस्ट वसाहतीच्या शेजारी असणा-या शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत सुरु करण्यात आलेला आहे.

हा नियंत्रण कक्ष देखील संपूर्ण वर्षभर व दिवसाचे २४ तास कार्यरत आहे. तसेच येथे आवश्यक ते मनुष्यबळ कार्यतत्पर ठेवण्यात आले आहे. बॅकअप नियंत्रण कक्ष मुख्य नियंत्रण कक्षाप्रमाणेच हॉट लाईन्स, बिनतारी यंत्रणा, हॅम रेडीओ यांनी जोडलेला आहे. तसेच हेल्पलाईन क्रमांक १९१६ यावर येणाऱ्या तक्रारी नोंदविण्याची पर्यायी व्यवस्था आहे.

२४ प्रशासकिय कार्यालयांमध्ये ‘विभागीय नियंत्रण कक्ष’

महापालिकेच्या मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर सर्व २४ प्रशासकिय विभागांमध्ये विभागीय नियंत्रण कक्ष प्रथमच स्वतंत्र मनुष्यबळासह सुसज्ज करण्यात आले आहेत. या प्रत्येक नियंत्रण कक्षांमध्ये थेट दूरध्वनी सेवा देण्यात आली आहे. या सोबतच बिनतारी यंत्रणा व ४ हॉट लाईन्स देखील प्रत्येक विभागीय नियंत्रण कक्षात कार्यान्वित करण्यात आले आहेत. या हॉटलाईन्सद्वारे मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष, संबंधित परिमंडळीय सहाय्यक पोलीस आयुक्त, स्थानिक अग्निशमन केंद्र व शहर आपत्ती व्यवस्थापन संस्थेतील पर्यायी नियंत्रण कक्ष यांच्याशी तात्काळ संपर्क साधता येणार आहे. (Breaking News)

समुद्रावरील सुरक्षितता

मान्सुन कालावधीत समुद्रास येणा-या मोठ्या भरतीच्या दिवशी (४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा) तसेच शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशी नागरिक समुद्रात बुडण्यासारख्या दुर्देवी घटना घडू नयेत, याकरिता ६ समुद्रकिना-यांवर जीवरक्षकांसह अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान, पोलीस पेट्रोलिंग वाहने तैनात असणार आहेत. नागरिकांनी समुद्रात प्रवेश करुन अपघात घडू नयेत याकरिता समुद्रावर धोक्याच्या सूचना देणारे सूचना फलक लावण्यात आले आहेत. (Mumbai News)

BMC
Asia Cup 2023: शुभमन गिल कर्णधार! तर या युवा खेळाडूंना मिळणार संधी;आशिया चषक स्पर्धेसाठी अशी असू शकते टीम इंडिया

आपत्‍कालीन परिस्थितीत ये संपर्क साधा

नागरिकांना आपत्‍कालीन परिस्थितीत बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन विभागाशी संपर्क साधावयाचा असल्‍यास त्‍यांनी खालील माध्‍यमांचा वापर करावा.

• १९१६ मदतसेवा क्रमांक

• संकेतस्‍थळ – dm.mcgm.gov.in

• मोबाईल अॅप – Disaster Management BMC

• इन्‍स्टाग्राम – my_bmc

• ट्वीटर हॅन्‍डल – @mybmc

• फेसबुक – myBmc

• यु ट्युब – MyBMCMyMumbai

• चॅटबॉट क्रमांक – ८९९९२२८९९९

नागरिकांना आवाहन

• मान्‍सुन कालावधीत नागरिकांनी समुद्र किनारी पाण्‍यात जाणे टाळावे.

• अतिमुसळधार पर्जन्‍यवृष्‍टीमुळे पूर सदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली असल्‍यास साचलेल्‍या पाण्‍यातून जाणे टाळावे.

• मान्‍सुन कालावधीत गडगडाट व वीजा चमकत असताना उघड्या परिसरात जाणे तसेच झाडाखाली उभे रहाणे टाळावे.

• महाराष्‍ट्र शासन, बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जारी केलेल्‍या सूचनांचे पालन करावे.

• अफवा पसरवू नयेत व अफवांवर विश्‍वास ठेवू नये. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com