Asia Cup 2023: शुभमन गिल कर्णधार! तर या युवा खेळाडूंना मिळणार संधी;आशिया चषक स्पर्धेसाठी अशी असू शकते टीम इंडिया

Asia Cup News: नुकताच संपन्न झालेल्या आयपीएल २०२३ स्पर्धेत युवा भारतीय खेळाडूंनी जोरदार कामगिरी केली आहे.
team india
team indiasaam tv
Published On

Team India: आशिया चषक स्पर्धेचा वाद काही थांबायचं नाव घेत नाही. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास नकार दिला आहे. तर इतर संघ देखील सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार देताना दिसून येत आहेत.

जर पाकिस्तानने यजमानपद सोडण्याचा हट्ट सोडला नाहीतर त्यांना आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडावं लागू शकतं. असे झाल्यास भारताची ब तुकडी आशिया चषक खेळण्यासाठी मैदानात उतरू शकते.

team india
Travis Head 1st centurion in WTC : IPLमध्ये कुणीही भाव नाही दिला; त्याच हेडने WTCच्या फायनलमध्ये टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली

आशिया चषक स्पर्धेसाठी भारताची ब तुकडी जाणार?

नुकताच संपन्न झालेल्या आयपीएल २०२३ स्पर्धेत युवा भारतीय खेळाडूंनी जोरदार कामगिरी केली आहे. त्यामुळे जर पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतली तर आयपीएल स्पर्धेत जोरदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आशिया चषक स्पर्धा खेळण्याची संधी जाऊ शकते .

ही स्पर्धा झाल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. जर पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर झाले तर, संघातील वरिष्ठ खेळाडूंना वर्ल्ड कप स्पर्धेचा सराव करण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं. अशा स्थितीत भारतीय संघाची ब तुकडी ही स्पर्धा खेळण्यासाठी जाऊ शकते.

स्पोर्ट्स विकीच्या वृत्तानुसार, यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, जितेश शर्मा, ध्रुव जुरेल, आकाश मधवाल, यश ठाकूर सारख्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. (Latest sports updates)

team india
WATCH WTC Final: वातावरण तापलं! गोलंदाजीला सज्ज झालेल्या सिराजला स्मिथने अचानक थांबवलं; पुढे जे झालं.. -VIDEO

असा असू शकतो भारतीय संघ:

आशिया चषक स्पर्धेत रोहित शर्मा,विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमी सारख्या दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. दरम्यान या दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली गेल्यास, शुभमन गिलला संघाचं कर्णधारपद दिलं जाऊ शकतं.

पाहा प्लेइंग ११:

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयसवाल, ऋतुराज गायकवाड़, ईशान किशन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, युजवेंद्र चहल, सुयश शर्मा, मयंक डागर,आकाश मधवाल,उमरान मलिक ,यश ठाकुर, अर्शदीप सिंह.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com