Maharashtra Today Weather Update News Saam Tv
महाराष्ट्र

Weather Update: राज्यात ऊन-पावसाचा खेळ, ६ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार; आज कुठे कसं राहिल हवामान?

Maharashtra Today Weather Update: राज्यात सध्या उकाडा प्रचंड वाढला आहे. अशातच हवामान खात्याने ६ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

Priya More
  • राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे

  • राज्यातील ६ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

  • विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. राज्यातील पाऊस गायब झाला असून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. अशात आज काही जिल्ह्यांतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची आज उकाड्यापासून सुटका होणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात आज ढगाळ वातावरण राहिल. या ठिकाणी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.

नैऋत्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. आज याची तीव्रता वाढली असून या भागामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याचाच परिणाम म्हणून अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. राज्यातील बळीराजा चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. या वर्षी चांगला पाऊस न झाल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे.

दरम्यान, राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. अनेक जिल्ह्यातील तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. सोलापूरमध्ये काल ३७.९ अंस सेल्सिअस तापमान होते. त्यानंतर यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यामध्ये ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पीएमपीच्या बस डेपोत सुधारणा करा, पुण्याच्या आयुक्तांचे आदेश

Morning Heel Pain: सकाळी झोपेतून उठताच पायाचे तळवे दुखतायत? ‘या’ गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण; डॉक्टरांनी सांगितली कारणं

Wai Fort : कातळात कोरलेल्या पायऱ्या अन् भव्य डोंगररांग; वाईजवळ लपलाय खतरनाक किल्ला, चढाई पाहूनच उडेल धडकी

ज्येष्ठ समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या मुलावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल; सामाजिक क्षेत्रात खळबळ

Marathi Actor : मराठमोळा अभिनेता लग्नाच्या ८ वर्षांनी झाला बाबा, PHOTO शेअर करत दाखवली मुलांची झलक

SCROLL FOR NEXT