Maharashtra Weather Alert  Saam TV news
महाराष्ट्र

Maharashtra Weather : पुढचे १० दिवस हवामान कसं असेल, पाऊस पडणार का? हवामान विभागाकडून माहिती

Maharashtra Weather Update: मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसानंतर राज्यात आता पावसाचा जोर ओसरल्याचे दिसत आहे. पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमी असून, खरिप हंगामाची तयारी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे, Namdeo Kumbhar

Maharashtra Rainfall Update, Monsoon Delay : मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पाऊस झाला. मात्र, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण खूपच कमी राहील. पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर अत्यल्प राहणार असून, 6 ते 10 जून दरम्यानही पावसाची स्थिती साधारणच असेल. वाऱ्यांचा वेगही कमी झाला असून, पुढील 10 ते 15 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. यामुळे मान्सूनचा पाऊस लांबणीवर पडल्याचे चित्र आहे.

राज्यात गेल्या आठवड्यामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. मात्र आता पावसाचं प्रमाण या आठवड्यामध्ये कमी होणार्‍या साधारणपणे गेल्या आठवड्यापेक्षा खूपच कमी प्रमाण असणार आहे. पुढचे चार ते पाच दिवस पावसाचा जोर अत्यल्प प्रमाण असल्याची परिस्थिती वातावरणात दिसत आहे. त्यामुळे पाऊस आता उघडलेला दिसत आहे. 6 जून ते 10 जून दरम्यान पावसाची स्थिती साधारणच दिसत आहे.

मे महिन्यात सरासरीपेक्षा 10 पटीने अधिक पाऊस झाल्याने शेतशिवारात चिखल झाला आहे. याचा परिणाम खरीप हंगामापूर्वीच्या मशागतींवर झाला असून, शेतकऱ्यांना मशागत न करताच ‘वाफसा’ येण्याची वाट पाहावी लागत आहे. काळ्या, खोल जमिनीत पेरणीयोग्य वाफसा येण्यासाठी किमान 10 ते 15 दिवस लागतात. मात्र, पुढेही पाऊस सुरू राहिल्यास पेरण्या लांबणीवर पडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

हवामानातील या बदलांमुळे शेतकऱ्यांपुढे नवे आव्हान उभे आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला, तरी मशागतीसाठी पुरेसा वेळ आणि योग्य हवामान मिळणे गरजेचे आहे. हवामान खात्याने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून, पेरणीच्या नियोजनासाठी स्थानिक हवामान अंदाजांचा आधार घेण्याचे आवाहन केले आहे. येत्या काही दिवसांत हवामानातील बदलांवर शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात मान्सूनला ब्रेक, कोकणात तुरळक पावसाची शक्यता

महाराष्ट्रात वेगाने दाखल झालेल्या मान्सूनच्या आगेकुचीला ब्रेक लागला आहे. कोकण किनारपट्टीवरील कमी दाबाचे क्षेत्र विरल्याने पावसाचा जोर ओसरला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत कमी दाबाचा प्रभाव आणखी कमी होईल. यामुळे कोकणात पुढील तीन दिवस केवळ तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तीव्र उष्णतेच्या झळा कायम राहतील. गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पाऊस जवळपास गायब झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT