Maharashtra Monsoon Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : पुण्यासह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

Maharashtra : हवामान विभागाकडून मुंबईसाठी येलो अलर्ट, तर कोकण आणि घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

  • मुंबईत येलो अलर्ट तर कोकण-घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

  • बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढला आहे.

  • पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार

हवामान विभागाने महाराष्ट्रासह गोव्याच्या किनारपट्टीसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा धोका असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाने मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता अधिक आहे. घाट परिसरात मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

मागील २४ तासांत म्हणजेच बुधवारी सकाळपर्यंत कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळला. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली. मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ३१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे हवामानातील बदलत्या स्थितीचे संकेत देणारे आहे. दरम्यान, विदर्भ आणि मराठवाडा भागात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण कायम होते, तर इतर भागांत उन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी येत राहिल्या.

नाशिक जिल्ह्यात पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवावा लागणार आहे. विशेषतः गंगापूर धरण ९८ टक्क्यांहून अधिक भरलेले असल्याने, जर पावसाचा जोर कायम राहिला तर मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागू शकतो. याचा थेट परिणाम गोदावरी नदीच्या पाणीपातळीवर होईल. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर होत आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या सर्व भागात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT