Weather Update : अकोल्याला पावसाचा फटका, नागरिकांना पाण्याने वेढले; पाच जणांचा थरारक रेस्क्यू

Akola News : अकोल्यातील उमरी भागात दोन तासांच्या पावसामुळे नाल्याचे पाणी घरात घुसले. विठ्ठलनगर भागात पाच नागरिकांचा रेस्क्यू करण्यात आला. अतिक्रमणामुळे दरवर्षी उद्भवणाऱ्या पूरस्थितीवरून नागरिक संतप्त झाले आहेत.
Weather Update :  अकोल्याला पावसाचा फटका, नागरिकांना पाण्याने वेढले; पाच जणांचा थरारक रेस्क्यू
Akola News Saam Tv
Published On
Summary
  • अकोल्यातील उमरी भागात पावसाचे पाणी घरात घुसले

  • विठ्ठलनगर भागात पाच नागरिकांचा थरारक रेस्क्यू

  • नाल्यावरील अतिक्रमणामुळे दरवर्षी निर्माण होते पूरस्थिती

  • प्रशासनाचे सर्वेक्षण सुरू केले असून पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

अक्षय गवळी, (अकोला प्रतिनिधी )

महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची संतधार पाहायला मिळत आहे. अशातच अकोला शहरातील उमरी भागात काल रात्री पावसामूळे हाहाकार उडाला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नाल्याचे पाणी उमरीतील अनेक घरांमध्ये शिरल्याने मोठं नुकसान झालं. नाल्यावर मोठ्या प्रमाणात बांधकामांचं अतिक्रमण झाल्यामुळे दरवर्षीच उमरीत या समस्येला नागरिकांना सामोरं जावं लागतं आहे. आज सकाळी नुकसानाच्या सरकारी सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.

अकोल्यातील उमरी आणि गुडधी भागात काल दोन तास झालेल्या जोरदार पावसानं अक्षरशः होत्याचं नव्हतं केलं. याला कारण ठरलं आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून नाला. या नाल्यावर मोठ्या प्रमाणात बांधकामांचे अतिक्रमण झालं आहे. या नाल्याचे पाणी रात्री उमरीतील नागरी वस्ती आणि रस्त्यांवर शिरलं. यामूळे रस्त्याला अक्षरश: तलावाचे स्वरूप प्राप्त झालं. मोठी उमरीतील विठ्ठलनगर भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले होते. आज सकाळीही नागरिकांच्या घरातील पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू होत आहे.

Weather Update :  अकोल्याला पावसाचा फटका, नागरिकांना पाण्याने वेढले; पाच जणांचा थरारक रेस्क्यू
Akola : पुरी- अहमदाबाद एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी; अकोला रेल्वे स्थानकावर आरपीएफची कारवाई

यामुळे अनेक घरात नागरिक अडकले होते. विठ्ठल नगर भागातल्या पाण्याने वेढलेल्या दोन घरातून पाच नागरिकांना लोकांकडून रेस्क्यू करण्यात आले आहे. आज सकाळी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, अशा नुकसानाच्या ठिकाणी सरकारी सर्वेक्षणाला प्रारंभ झाला आहे. या भागाचे आमदार रणधीर सावरकर यांनी आज सकाळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी भाजपचे पदाधिकारी संदीप गावंडे, मिलिंद राऊत, संदीप शेगोकार सह आदी पदाधिकारी उपस्थित होती. पुढच्या पावसाळ्यापर्यंत उमरी आणि गुडधी भागाचा प्रश्न मिटलेला दिसणार, असं आश्वासन भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी दिले.

Weather Update :  अकोल्याला पावसाचा फटका, नागरिकांना पाण्याने वेढले; पाच जणांचा थरारक रेस्क्यू
Akola Police : दहशत माजविणाऱ्यांची उतरविली मस्ती; पोलिसांनी शहरातून काढली धिंड

दरम्यान, नागपूर हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार अकोला जिल्ह्यात पुढील ३ दिवस पावसाची शक्यता आहे. आजपासून ३० ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. पावसामुळे नदी, नाले व तळ्यांतील पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे अनावश्यकपणे पाण्यात जाण्याचे धाडस करू नये.

Weather Update :  अकोल्याला पावसाचा फटका, नागरिकांना पाण्याने वेढले; पाच जणांचा थरारक रेस्क्यू
Maharashtra Government: राज्यातील शिक्षकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, टप्पा अनुदानाला मंजुरी

नदीमध्ये वाहून जाणे किंवा बुडण्याची शक्यता असल्याने पुर आलेल्या रस्त्यावरून गाडी चालविणे टाळावे. पाणीसाठ्याजवळ सेल्फी काढण्याचा मोह करू नये. वीज व पावसापासून बचावाकरिता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. अशास्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. नदीकाठाजवळील गावातील गावक-यांना सतर्कतेची सुचना देण्यात आली आहे, असे आवाहन अकोला जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com