Maharashtra Weather Forecast Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे ३ दिवस महत्वाचे, उष्णता आणखी वाढणार; आज कुठे कसं हवामान?

IMD Alert For Mumbai: राज्यावर असलेले अवकाळीचे संकट काही प्रमाणात दूर झाले आहे. पण आता पुन्हा सूर्य आग ओकणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील तापमान वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मुंबईला उष्णतेचा अलर्ट दिला आहे.

Priya More

राज्यात अवकाळी पावसाने उसंत घेतली त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. एकीकडे अवकाळी पाऊस गेला असला तरी दुसरीकडे उन्हाचे चटके आणखी वाढणार आहे. सूर्य पुन्हा आग ओकणार असून राज्यातील अनेक जिल्ह्याचे तापमान ४० अंशांवर जाण्याची शक्यता आहे. रविवारी अनेक जिल्ह्यातील तापमान ४० अंशावर पोहचल्याचे पाहायला मिळाले. आता हवामान खात्याकडून राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत उकाडा प्रचंड वाढणार आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईमधील तापमान वाढण्याची शक्यता आहे. सोमवार ते बुधवार या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबईचे कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाऊ शकते. किमान तापमानाचा पाराही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. उन्हापासून आणि उकाड्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. १० एप्रिलनंतर तापमान कमी होऊन मुंबईत उष्णतेचा त्रास कमी होईल असे देखील हवामान खात्याने सांगितले.

हवामान खात्याने असे देखील सांगितले की, राज्यातील इतर जिल्ह्यांतील तापमानात वाढ होऊन उन्हाच्या झळा आणखी वाढणार आहेत. तर उकाड्यातील वाढ कायम राहिल. आज कोकणात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरीत राज्यात ढगाल वातावरण राहिल आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. वाढती उष्णता लक्षात ङेता नागरिकांनी काळजी घ्यावी असे देखील सांगितले जात आहे.

दरम्यान, रविवारी राज्यातील ब्रह्यपुरी, चंद्रपूर, नागपूर, धुळे, जळगाव आणि नाशिक याठिकाणी उष्णाचा पारा जास्तच वाढला होता. संभाजीनगर, परभणी, सोलापूर, बुलडाणा, भंडारा आणि गडचिरोलीमध्ये तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहचले होते. पुण्यातही तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता. संभाजीनगर यंदाच्या उन्हाळ्यातील रविवार सर्वात जास्त हॉट ठरला. संभाजीनगरमध्ये यावर्षी ४०.२ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. यंदाच्या उन्हाळ्यातील हे रेकॉर्डब्रेक तापमान आहे. सकाळी ११ ते ५ पर्यंत कडक उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य होते. तापमान प्रचंड वाढल्यामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भयंकर! मुंबईतील प्रसिद्ध रूग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला; तिघे गंभीर जखमी, VIDEO व्हायरल

Pune Accident: कुंडेश्वर अपघाताची पुनरावृत्ती! चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला; ८ जण गंभीर जखमी

Maharashtra Live News Update: नांदेडमधील सकल मराठा समाजाने पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

Winter Hair Care : थंडीमध्ये केस गळणे थांबवण्यासाठी करा हे घरगुती सोपे उपाय

Saturday Rules: शनिवारी केस कापावे की नाही?

SCROLL FOR NEXT