Heat wave in Mumbai and North Konkan; Rain with thundershowers expected in South Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather: मुंबईसह उत्तर कोकणाला उन्हाचे चटके; दक्षिण महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस, भर उन्हाळ्यात ऊन-पावसाचा खेळ!

Maharashtra Weather Update: हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन दिवसांत मुंबई आणि उत्तर कोकणात तीव्र उष्णता आणि आर्द्रता जाणवण्याची शक्यता आहे. तर दक्षिण महाराष्ट्रात वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • मुंबई आणि उत्तर कोकणात पुढील दोन दिवस उष्ण आणि दमट हवामान.

  • विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता.

  • अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम येथे उष्णतेचा तडाखा.

दिवसेंदिवस राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. वाढत्या उन्हाचा लोकांना मोठा त्रास होतोय. राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट नोंदवण्यात आलीय. मागील २४ ते ४८ तासांमध्ये उत्तर कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. अजून दोन दिवस येथील हवामान उष्ण असणार आहे. मात्र दुसरीकडे दक्षिण महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

भर उन्हाळ्यात ऊन-पावसाचा खेळ रंगणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील काही भागांमध्ये पाऊस होणार आहे, तर काही भागांमध्ये उन्हाचे चटके बसणार आहेत. पुढील दोन दिवस मुंबई आणि उत्तर कोकण भागात अति उष्ण आणि दमट वातावरण असणार आहे. तसेच विदर्भात उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

बहुतांश जिल्ह्यांत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशीममध्ये उष्णतेचा तडाखा बसणार आहे. नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांतही तापमान ४० अंशांच्या आसपास असेन. उत्तर-पश्चिम वाऱ्यामुळे येथील तापमानात वाढ होणार आहे. तर राज्यातील काही भागातील विजांच्या कडकडाटासह पावसाची देखील शक्यता पुणे वेधशाळेनी वर्तवली आहे.

दरम्यान या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे. तर आज गुरुवारी राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली. तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे. आज अमरावती, अकोला, ब्रह्मपुरी आणि यवतमाळमध्ये उष्णतेची लाट नोंदवण्यात आली आहे. नाशिकमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकचा पारा ३८.५ अंशावर गेलाय. कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत आहे. किमान तपमान १६.८ अंश सेल्सिअस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kangana Ranaut: '...आता का चर्चेपासून पळता?'; कंगना रणौत यांची राहुल गांधींवर सडकून टीका

Baramati Crime: शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी बॉयफ्रेंडने गोळी दिली, काही तासांत तरुणीचा मृत्यू; बारामती हादरली

Maharashtra News Live Update: विजय थलापतीचा जबरा फॅन, थलापतीला भेटण्यासाठी निघाला देगलूरहून पायी यात्रेवर

EPFO New Rules: कामाची बातमी! PF मध्ये झाले ९ मोठे बदल, थेट तुमच्यावर होणार परिणाम, आताच घ्या माहिती जाणून

मूड खराब असेल तर घ्या सुट्टी! काय आहे ‘Unhappy Leave’ पॉलिसी? समजून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT