Maharashtra Weather Forecast Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळीचा तडाखा, महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट; IMDचा हायअलर्ट

Weather Update : मे महिन्याच्या सुरुवातीलाच आकाश ढगाळलेले दिसत आहेत. सकाळी ९ वाजता, वारे ताशी सुमारे ५ किमी वेगाने वाहतील, तसेच आर्द्रता ७५% राहील आणि तापमान २९ अंश सेल्सिअस राहील.

Prashant Patil

मुंबई : राज्यातील अनेक शहरांमध्ये उन्हाचा तडाखा बसत असतानाच राज्यावर अवकाळीचेही ढग घोंघावत आहेत. यामुळे हवामान विभागाने पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा या भागांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

IMD दिलेल्या माहितीनुसार, आज ५ मे रोजी मुंबईत पाऊस आणि वादळी वारे वाहतील. मे महिन्याच्या सुरुवातीलाच आकाश ढगाळलेले दिसत आहेत. सकाळी ९ वाजता, वारे ताशी सुमारे ५ किमी वेगाने वाहतील, तसेच आर्द्रता ७५% राहील आणि तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, ज्यामुळे आज सौम्य वारे वाहतील. दिवसा तापमानात वाढ दिसून येईल. हवामान खात्याच्या अहवालानुसार, ५ मे रोजी मुंबईत आकाश ढगाळ राहिल आणि दुपारी किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाऊस सुरू आहे. त्यानंतर परत एकदा हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट होऊ शकते, असा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, जालना शहरासह जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातील अनेक भागांना गारपिटीचा देखील तडाखा बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT