Maharashtra Weather Forecast Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा भयानक प्रकोप! कोकणात उष्णतेचा इशारा; तर 'या' जिल्ह्यांत धो-धो पावसाचा हायअलर्ट

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला असून कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीत उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा घाटमाथ्यावर विजांसह पावसाची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra October heat and humidity forecast : पावसाची तूट आधीच पडलेली आहे, त्यातच ऑक्टोबर हिटने राज्यातील नागरिकांना चांगलाच घाम फोडला आहे. उन्हाचा चटका दिवसेंदिवस अधिक तापदायक ठरत आहे. मान्सून संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी फिरल्यानंतर आता 'ऑक्टोबर हिट'चा प्रभाव तीव्र होत असल्याचे दिसतेय. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात कमाल तापमानाचा पारा वेगाने वाढत आहे. मुंबई, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे.

कोकण किनारपट्टीच्या भागासाठी हवामान विभागाने उष्णतेचा 'येलो अलर्ट' जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस उष्ण आणि अतिशय दमट (Humid) हवामान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये तापमानाचा पारा तब्बल ३८.७ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने किनारपट्टी भागात नागरिकांना उकाड्याचा मोठा सामना करावा लागत आहे. दमट हवामानामुळे अस्वस्थता वाढली असून दुपारच्या वेळी नागरिकांनी गरज नसल्यास बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाचा अंदाज

एकीकडे उन्हाच्या झळा आणि उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतानाच, दुसरीकडे राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.

चक्रीवादळाची स्थिती

थायलंडच्या किनाऱ्यालगत सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे १३ ऑक्टोबरपर्यंत अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काही दिवसांत हवामानात मोठे बदल घडून येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र आकाश ढगाळ राहील आणि उन्हाचा चटका कायम राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जंतर-मंतरवर सीजीपीचं आंदोलन, दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद

Heart Care : हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय आहे फरक? वेळीच घ्या जाणून

Saturday Horoscope : खर्च वाढेल अन् प्रगती होईल; 5 राशींचा शनिवार जाणार मजेत

सत्ताधाऱ्यांना CJPच्या आंदोलनाचा धसका? मेट्रो आणि रेल्वे बंद, CJP आंदोलकांची धरपकड

फ्रान्समध्ये विद्यार्थी आंदोलनाचा भडका, ट्रम्प यांच्या विधानानं जनतेत संताप

SCROLL FOR NEXT