Maharashtra Weather Forecast Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Forecast: मान्सूनवार्ता! 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; कसं असेल आजचं हवामान?

Rohini Gudaghe

खान्देश, पूर्व विदर्भाचा काही भाग सोडून राज्याच्या बहुतांश भागात मोसमी वारे पोहोचले आहेत. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर १४ जूनपासून राज्यात पावसामध्ये काही खंड पडण्याची शक्यता वर्तवली (Maharashtra Weather Forecast) आहे.

मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम पावसाची शक्यता आहे. तर धाराशिव, लातूर, बुलडाणा, पुणे, नगर, सोलापूर, अकोला, अमरावती, वाशीम, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

विदर्भ, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी १२ जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला (Rain Alert) आहे. यावेळी मराठवाडा आणि कोकणामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी असल्याचं पाहायला मिळालं. राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसल्या. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. आजही अनेक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता (Weather Update) आहे. मुंबई आणि उपनगरांत ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सुरूवातीला मान्सून मुंबईत दाखल झाला. त्यानंतर मान्सूनने आता हळुहळु संपूर्ण राज्य व्यापण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली (Monsoon) आहे. पुढील २४ तासांत देखील राज्यात पावसाची बॅटिंग अशीच सुरू राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT