सोलापूरात मागच्या आठ दिवसांपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सोलापूरच्या लिमयेवाडी परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं असल्याचं समोर आलं आहे. नागरिक मागच्या चार दिवसांपासून रात्र जागून काढत आहेत. पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. आर्थिक नुकसान तर होत आहेच, परंतु अन्नपाण्याची देखील नागरिकांची गैरसोय होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, घरात सगळीकडे पाणीच पाणी (Rain Viral Video) आहे. अगदी गुडघ्यापर्यंत पाणी असल्याचं दिसत आहे. त्या ठिकाणी घरात पाय ठेवायला देखील जागा नाहीये. या घरातील महिला एका खुर्चीवर बसली असल्याचं दिसत आहे. सगळा संसार पाण्यात गेलाय. पावसानं सोलापूरकरांच्या डोळ्यात पाणी आणल्याचं दृश्य या व्हिडिओमध्ये दिसत आहे. नागरिकांच्या तोंडचं पाणीचं पावसाने (Rain Video) पळविल्याचं दिसत आहे.
अकोला जिल्ह्यात सुद्धा काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. विजेच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. मूसळधार पावसामूळ अकोल्यातले नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान नदीला आलेल्या पहिल्या पुरात अकोल्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पठार नदीवरील मरोडा, दिनोडा आणि पनोरी येथे नवीन पुलाचे बांधकाम सुरु (Rain Update) आहे. त्यामुळे बाजूला पर्यायी रस्ता म्हणून वाहतूकीसाठी भराव टाकण्यात आला होता. काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे या तिन्ही ठिकाणचे नदीवरील पर्यायी रस्त्यावरील भराव वाहून गेला आणि त्यामुळे अनेक गावांचा पुढं संपर्क तुटला आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या नागपूर येथील केंद्रातर्फे अकोला जिल्ह्यात पुढील १६ जूनपर्यत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान वाऱ्याचा ताशी 40 ते 50 किमी असेल, असा अंदाज (Monsoon Update) आहे. नागरिकांनी वादळाच्या स्थितीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. झाडाखाली थांबू नये. वीज चमकत असताना मोबाईल, वीजेची उपकरणे बंद ठेवावी. वाहने विजेचा खांब आणि झाडे यापासून दूर ठेवावीत, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.