भारतीय हवामान विभागाने (Maharashtra Weather) कोकणामध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या अवकाळीनं थैमान मांडल्याचं दिसत आहे. पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज देखील राज्यात (Weather Update) अनेक ठिकाणी अवकाळी पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणेसह कोकणातील तापमानाचा पारा वर चढत चालला आहे. त्यामुळे या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.
विदर्भात तुरळक ठिकाणी आज गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकणात तापमान वाढल्याने चांगलाच उकाडा जाणवत (Heat Wave Alert In Kokan) आहे. यातच राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने तडाखा दिला (Rain Alert) आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. आज कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
२४ एप्रिलपर्यंत सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी म्हणजेच ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कमाल तापमानात चढ-उतार होत (Maharashtra Weather Update) आहे. धुळे, जळगाव, ब्रह्मपुरी येथील तापमान ४० अंश सेल्सिअसवर आहे. आज कोकणात उष्ण दमट हवामान, तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.
मालेगाव (४१.८), धुळे (४१), जळगाव (४०.८), ब्रह्मपुरी (४०.८) ही ४० अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे (Weather Forecast Update) आहेत. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे, तर जळगाव, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, वाशीम, (Weather) यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात उष्णतेच्या लाटेबरोबरच अवकाळी पाऊस हजेरी लावीत आहे. पुढील तीन दिवस म्हणजेच 26 एप्रिलपर्यंत मध्यमहाराष्ट्र, कोकण, मराठवाडा तसेच विदर्भात अवकाळी पाऊस, वादळी वारे, मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह बरसणार आहे. मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत कार्यरत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता पूर्णपणे कमी झाली आहे. मात्र मध्य महाराष्ट्रावर सक्रिय असलेल्या चक्रिय स्थितीमुळे राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. कमाल तापमान देखील मागील काही दिवसांपासून 40 अंश सेल्सिअसच्या आसपास रेंगाळले आहे. उष्णतेचा तडाखा कायम असून, रात्रीच्या उकाड्यात तेवढीच वाढ झालेली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.