Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather: कोकणासह विदर्भाला पाऊस झोडपून काढणार, कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट?

IMD Alert For Maharashtra: राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भाला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Priya More

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता मान्सून देखील महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सून यावर्षी तारखेपेक्षा १० दिवस आधीच दाखल झाला असून वेगाने पुढे सरकत आहे. मान्सूनचा पाऊस सध्या राज्यात धुमाकूळ घालताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यात पहिल्याच पावसाने मोठा फटका बसलाय. आज देखील राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे.

आज कोकण आणि पूर्व विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

हवामान खात्याने आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांचा घाटमाथा, विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, मुंबईसह पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत देखील जोरदार पावसाची शक्यता असून याठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, रत्नागिरीत पडणाऱ्या मुसळधार पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मात्र रत्नागिरीला अद्यापही आँरेंज अलर्टचा इशारा आहे. जिल्ह्यात सरासरी ४६२ मिमी इतका पाऊस पडला. तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत १३ टक्के पाऊस पडला. गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे टँकरग्रस्त गावांना दिलासा मिळाला. तर रत्नागिरीतल्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालीये. आजही आँरेंज अलर्ट असल्याने मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT