IMD Alert For Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather: राज्यावर आजही अवकाळी पावसासह गारपिटीचं संकट, कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज- येलो अलर्ट?

IMD Alert For Maharashtra: राज्यावर अवकाळीचे संकट आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. या अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात आला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

Priya More

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. एकीकडे काही जिल्ह्यांमध्ये तापमान वाढले आहे तर काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पडणारा पाऊस झोडपून काढत आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होत आहे. आज देखील हवामान खात्याकडून विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ वगळता उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज वादळी वारे, मेघर्गना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊ पडण्याची शक्यता आहे. त्याचसोबत गारपीट देखिल होण्याची शक्यता आहे. कोकणाला देखील अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे.

आज विदर्भातील चंद्रपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असू हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उर्वरित विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून याठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे.

हवामान खात्याने ३ एप्रिल आणि ४ एप्रिल रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याकडून आज आणि उद्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, सातारा, सोलापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. तर अहमदनगर, पुणे घाट, कोल्हापूर घाट, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला ₹३००० मिळणार नाही? कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

SCROLL FOR NEXT