Heat Wave Saam tv
महाराष्ट्र

Weather Update : सूर्य कोपला! राज्यात उष्णतेची तीव्र लाट; विदर्भाला येलो अलर्ट, पारा ४४ अंश पार

Heat wave in Vidarbha : विदर्भात ४४ अंशांवर पारा, यलो अलर्ट जारी! मराठवाड्यात उष्णतेचा तडाखा तर काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील पूर्ण हवामान अपडेट इथे वाचा.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Weather Update News Update : अवकाळी पावसानंतर पुन्हा एकदा कडाक्याचं ऊन पडायला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात सूर्य आग ओकतोय. त्यामुळे गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, अशा सूचना देणयात आल्या आहेत. विदर्भातील अनेक जिल्ह्याचा पारा ४४ अंशावर पोहचला आहे. पुढील दोन दिवस आणखी तापमान वाढण्याची शक्यता आहे. हवमान विभागाने विदर्भात उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे.

राज्यात एकीकडे उष्णतेचा इशारा दिला असतानाच काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा अन् लातूरमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भावर सूर्य कोपला

विदर्भात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अवकाळी पावसानंतर सूर्य आग ओकत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अकोल्याचे कमाल तापमान 44 अंशावर पोहोचले आहे. पुढील दोन दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याचीच शक्यता आहे. गेल्या काही दिवसात विदर्भातील पारा सरासरीपेक्षा चार अंशांनी वाढला आहे. अकोल्याचे तापमान राज्यातील सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

पुढील दोन दिवस विदर्भात उष्ण लाटांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाकडून उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बदलत्या वातावरणीय स्थितीमुळे मध्य भारत, उत्तर-पश्चिम राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात 2 ते 4 अंशाची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात कुठे किती तापमान?

अकोला - 44.2

ब्रह्मपुरी मध्ये 43.8,

अमरावती आणि चंद्रपूर मध्ये 43.6° तर

नागपुरात 42.4

वाशीम - 42.2

वर्धा - 42.4

यवतमाळ - 42 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद

मराठवाडाही तापला -

यंदाच्या उन्हाळ्यातील चालू आठवडा हा मराठवाड्यासाठी अति हॉट ठरतोय. आता मराठवाड्यात आगामी 3 दिवस उष्णतेची लाट असेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये 41 अंश सेल्सिअस तापमान होतं. तर तीच स्थिती मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये होती. मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यात आता उन्हाने चाळिशी पार करून पुढे प्रवास सुरू केलाय. या उन्हाचा फटका चांगलाच बसू लागलाय. त्यामुळे दुपारी रस्ते आता निर्मनुष्य दिसू लागले.

पावसाचा इशारा -

हवामान विभागाने कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर सोलापूर आणि परभणी जिल्ह्यात बुधवारी तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी, नांदेड जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT