Maharashtra Weather : सूर्य अक्षरशः आग ओकतोय, महाराष्ट्र तापला; अंगाची लाहीलाही, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

Maharashtra Weather Update : अकोल्यात आज या मोसमातलं सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं आहे. अकोल्याचा पारा आज ४४.२ अंशांवर गेला आहे. काल अकोल्याचे तापमान ४३.२ अंश सेल्सिअस होतं.
maharashtra weather temperature
maharashtra weather temperature Saam Tv News
Published On

मुंबई : महाराष्ट्रातील तापमानात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा ३५ ते ४० अंशाच्या घरात गेला आहे. तर काही ठिकाणी ४२ ते ४३ अंशावर तापमानाचा पारा चढला आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यात आज राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. अकोल्यात आज तापमानाचा पारा ४४.२ अंशांवर पोहोचलाय. तर चंद्रपूरमध्ये ४३.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यात आज या मोसमातलं सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं आहे. अकोल्याचा पारा आज ४४.२ अंशांवर गेला आहे. काल अकोल्याचे तापमान ४३.२ अंश सेल्सिअस होतं. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यात देखील तापमानात मोठी वाढ झाली आहे. आज चंद्रपुरात तापमानाचा पारा ४३.६ अंशावर गेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यात देखील तापमानाचा पारा चांगलाच वाढल्याचं दिसत आहे.

maharashtra weather temperature
Sakal Study Report : १०० दिवसांत फडणवीस सरकारचं काम कसंय? पाहणी अहवालातून समोर आली आकडेवारी

हिंगोलीत तापमानाचा पारा ४१ अंशावर पोहोचला असून परभणी शहरासह जिल्ह्यात मागच्या २ दिवसांपासून तापमान चांगलंच वाढलं आहे. काल ४० तर आज थेट ४१.०३ अंशांवर तापमान गेलं आहे. सलग दोन दिवस तापमान चाळीशी पार गेल्याने सर्वत्र प्रचंड उकाडा जाणवत आहे.ज्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच बाजारपेठेत ही दुपारच्या सुमारास शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सध्या अकोल्यात सूर्य अक्षरशः आग ओकतोय. आज अकोल्यात या मोसमतला सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आलं आहे. काल अकोला हे महाराष्ट्रातलं सर्वाधिक उष्ण शहर होतं. कालचा अकोल्याचा पारा ४३.२ अंशावर होता. या वाढत्या तापमानाचा परिणाम अकोल्याच्या जनजीवनावर झालाय. दुपारच्या वेळी अकोल्यातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसतोय.

maharashtra weather temperature
Deenanath Hospital : गेल्या काही दिवसांपासून दडपणाखाली, धमक्यांचे फोन, रात्री झोप नाही; डॉ. घैसास यांनी राजीनाम्यात काय काय म्हटलंय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com