सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपने नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवले.
मतांची फोडाफोड आणि क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा.
महायुतीचे धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांच्यात लढत.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेने आपले सर्व नगरसेवक हॉटेल ठेवले आहेत. आता सातारा सांगलीत भाजपही सावध झाले असून त्यांनी आपल्या नगरसेविकांना अज्ञातस्थळी नेलं आहे. सांगली-सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपकडे अधिक संख्याबळ असूनही त्यांना मतांच्या पळवापळीची भीती आहे.
येथे धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून अभयसिंह जगताप निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली महानगरपालिकेचे भाजपचे सर्व नगरसेवक अज्ञात स्थळी सहलीला रवाना झालेत.
सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीत दगा होऊ नये म्हणून भाजपकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे. विधानपरिषदेसाठी 18 जूनला मतदान होणार आहे. त्यामुळे भाजपकडून सतर्कता बाळगण्यात आली आहे. एका खासगी एसी ट्रॅव्हल्समधून नगरसेवक आणि नगरसेविकांना अज्ञात ठिकाणी पाठवण्यात आले आहे. नगरसेवकांसोबत कुटुंबीयातील पती, पत्नी, मुलांसह सदस्यही सहलीवर गेले असल्याची माहिती आहेत.
महायुतीमध्ये सांगली सातारा विधानपरिषद मतदारसंघ भाजपकडे आहे. या मतदारसंघात भाजपनं धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे सहज विजय होईल इतकं संख्याबळ आहे.
पण या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धत असल्यानं धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या भूमिका निर्णायक ठरणार आहे. साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांची भूमिका देखील निर्णायक ठरणार आहे. या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची याचे सर्वाधिकार मंत्री मकरंद पाटील यांना देण्यात आलेत. आता मकरंद पाटील वरिष्ठांसोबत बोलून यासंदर्भातील निर्णय जाहीर करतील. दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या उपरोधिक वक्तव्यामुळे भुवया उंचावल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.