शरद पवार गटाला मोठा धक्का; राष्ट्रवादीतील मोहितेंचा शिवसेनेत प्रवेश? शिंदेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण

Maharashtra Politics : साताऱ्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये अविनाश मोहिते यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला आहे.
 Maharashtra Politics :
Sharad Pawar Camp Faces Setback? Avinash Mohite's Alleged Shiv Sena Entry Sparks Political StormSaam tv
Published On
Summary
  • कृष्णा साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले

  • अविनाश मोहिते हे राष्ट्रवादी शरद पवार गटातील महत्त्वाचे नेते

  • सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस २७ वा वर्धापनदिन साजरा करत आहे, त्याचवेळी साताऱ्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत दरम्यान एकनाथ शिंदेंनी डाव टाकत राजकारण तापवलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आलीय इतकी चर्चा येण्याचं कारण म्हणजे, अविनाश मोहिते पाटील यांच्याविषयी केलेला दावा.

 Maharashtra Politics :
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी पुन्हा डाव टाकला; सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

कृष्णा साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. त्यामुळे सातारा व सांगली जिल्ह्यातील राजकारण तापलंय. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा कारखान्याची निवडणूक सध्या रंगात आली आहे.

 Maharashtra Politics :
Maharashtra Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; सोलापुरातील बडा नेता पक्षाला रामराम ठोकणार?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते व कृष्णा साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्याचे फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. कृष्णा कारखाना निवडणुकीत अविनाश मोहिते यांच्याविरोधात भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांना काँग्रेसचे विश्वजीत कदम राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उदयसिंह पाटील हे मदत करत आहेत. त्याचदरम्यान शिंदे गटाच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केल्याच्या फेसबुक पोस्टमुळे ही निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अविनाश मोहिते यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. एका आठवड्यापूर्वीच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे निवडणूक प्रचारासाठी गेले होते. आपण शरद पवार यांचा निरोप घेऊन आलोय, अशी साद घालत त्यांनी सभासदांना घातली होती. कराड येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त आयोजित कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनलच्या प्रचार शुभारंभ मंगळवारी (दि. २) झाला होता. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com