Unseasonal Rain
Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Unseasonal Rain: पुण्यासह ८ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पडणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

Priya More

राज्यामध्ये ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झोडपून काढले आहे. तर काही ठिकाणी वाढत्या तापमानमुळे नागरिक हैराण झाले आहे. अशामध्ये आता हवामान खात्याने (Weather Department) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहेत. त्याचसोबत नागरिकांना काळजी घेण्याचे आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढच्या दोन ते तीन तासांत राज्यातील पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले पिक निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे शेतपिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले. भाजीपाला, आंबा, संत्रे, कांदा, मका, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. अशामध्ये सरकारने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तर दुसरीकडे, राज्यातील जनता उकाड्यामुळे हैराण झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर पोहचले आहे. त्यामुळे वाढते तापमान आणि उकाड्यामुळे शरीराची लाहीलाही होत आहे. अशामध्ये काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अशामध्ये वाढते तापमानामुळे राज्यात उष्माघाताचे रुग्ण वाढत चालले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि ११ ते ३ च्या दरम्यान घराबाहेर पडू नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Gous Shaikh Motivatinal Story | पायाने पेपर लिहला! हात नसलेल्या या चॅम्पीयनचा पॅटर्नच वेगळा आहे.

Special Report : चिकन फ्राय की गटर फ्राय? संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर आक्षेपार्ह टप्पणी करणं भाजप उमेदवाराला पडलं महागात, निवडणूक आयोगाने केली मोठी कारवाई

Tanisha Bormanikar HSC News | बुद्धीबळ खेळणाऱ्या तनिषाने थेट 100 पैकी 100 मार्क्स मिळवले!

Special Report | Pune Porche Accident : मुलगा बेदरकार, बाप जबाबदार! पुणे अपघात प्रकरणातील मोठी घडामोड

SCROLL FOR NEXT