Pune Lok Sabha Election 2024: पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी MIM कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी

MIM Candidate Anis Sundke: एमआयएम पक्षाने पुणे लोकसभा मतदारसंघातून अनिस सुंडके (Anis Sundke) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अनिस सुंडके हे गेल्या २५ वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रीय आहेत. आता पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
Anis Sundke
Anis SundkeSaam Tv

पुण्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Pune Loksabha Election 2024) एमआयएम पक्षाकडून (MIM Party) अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. एमआयएम पक्षाने पुणे लोकसभा मतदारसंघातून अनिस सुंडके (Anis Sundke) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अनिस सुंडके हे गेल्या २५ वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रीय आहेत. आता पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

पुण्यामध्ये एमआयएम पक्षाकडून अनिस सुंडके यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले आहे. एमआयएम पक्षाने आज अनिस सुंडके यांच्या नावाची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली. अनिस सुंडके हे गेल्या २५ वर्षांपासून पुण्यातील राजकारणात सक्रिय आहेत. अनिस सुंडके नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष राहिले आहेत. त्यांचा छोटा भाऊ रईस सुंडके नगरसेवक राहिले आहेत. तर अनिस सुंडके यांची पत्नी हमिदा सुंडके या पुणे मनपा 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून आल्या होत्या.

Anis Sundke
Ajit Pawar: 'तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ, त्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा', अजित पवारांचे इंदापूरमध्ये विधान

गेल्या पंचवीस वर्षापासून पुणे येथील राजकारणात सक्रीय असलेले अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांचे कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे. आज औरंगाबाद येथे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुदुल मुस्लिमिन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे औरंगाबादमधये इम्तियाज जलील यांच्या निवडणूक प्रचारासाठी आले होते. याच दरम्यान झालेल्या जाहीर सभेत ओवेसी यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून अनिस सुंडके यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

Anis Sundke
Sanjay Raut: बंडखोरी करणाऱ्यांची पक्षाने हकालपट्टी करावी, संजय राऊतांची विशाल पाटील यांच्यावर टीका

दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून या मतदारसंघांमध्ये वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशामध्ये आता एमआयएम पक्षाने देखील आज आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. अनिस सुंडके या मतदारसंघात एमआयएमकडून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

Anis Sundke
Abhijeet Bichukale: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणूक लढवणार, १९ एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com