नवी दिल्ली : सर्वात कठीण परीक्षा म्हटली जाणाऱ्या यूपीएससीची नागरी सेवा परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत अनेक उमेदवार मोठ्या मेहनतीने परीक्षा उत्तीर्ण होतात. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी नेहमी इतरांना प्रेरणा देतात. आयुष्यातील खडतर परिस्थितीत न डगमगता या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या अनिमेष प्रधानने विद्यार्थ्यांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे. आई-वडिलांचं मायेचं छत्र हरपल्यानंतरही त्याने अथक प्रयत्न करत यश मिळवलं आहे. या घवघवीत यश मिळवणाऱ्या अनिमेषचं सर्वत्र कौतुक होत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, यूपीएससी नागरी सेवा -२०२३ परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला आहे. ओडिशात राहणाऱ्या अनिमेषने देशातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याने पहिल्या प्रयत्नात हे यश संपादन केलं आहे.
या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या अनिमेष प्रधानने एनआयटी राऊरकेलामधून कॉम्प्युटर सायन्समधून बीटेक पूर्ण केलं आहे. त्याने इंडिया ऑइल कॉर्पोरेशनमध्येही काम सुरु केलं होतं. त्याचवेळी त्याने यीपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरु केली होती.
अनिमेष प्रधानला जीवनातील अनेक संकाटांना तोंड द्यावं लागलं. तो इयत्ता ११ वी मध्ये असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. तर त्यानंतर आईचं कर्करोगाने निधन झालं. यूपीएससी परीक्षेची तयारी करताना या घटना घडल्या.
आजारी आईवर उपचार सुरु असताना त्याने या परीक्षेचा अभ्यास सुरु ठेवला होता. कठीण प्रसंगीही त्याने अभ्यास सुरु ठेवल्याने मोठं यश मिळवलं आहे. त्याने ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आईचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
बीडच्या अभिजीत पाखरेने यूपीएससी परीक्षेत मोठं यश संपादन केलं आहे. बीडच्या शिरुरच्या तालुक्यातील पाडळी येथे त्याने प्राथमिक शिक्षण घेतलं. अभिजीतने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन बीडीओची नोकरी देखील मिळवली. नोकरीत असताना त्याने यूपीएससीचा अभ्यास सुरु ठेवला. चारवेळा अपयश आलं, मात्र खचला नाही. पाचव्यांदा दिलेल्या परीक्षेत अभिजीतने हे मोठं यश संपादन केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.