UPSC Exam: देशातील बॅडमिंटनपटूने UPSC परिक्षेत मिळवले घवघवीत यश; वडील होते उत्तराखंडचे डीजीपी

Kuhoo Garg UPSC Exam Rank: केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC) च्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या परिक्षेत देशाची बॅडमिंटनपट्टू कुहू गर्गनेदेखील यश मिळवले आहे.
Kuhoo Garg
Kuhoo GargSaam Tv

केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC) च्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या परिक्षेत देशाची बॅडमिंटनपट्टू कुहू गर्गनेदेखील यश मिळवले आहे. कुहू ही उत्तराखंडचे माजी डिजीरी अशोक कुमार यांची मुलगी आहे.

कुहू (Kuhoo Garg) उत्तम बॅडमिंटनपट्टू (Badminton Player) आहे. कुहूने आतापर्यंत ५६ अखिल भारतीय पदके आणि १८ आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहे. कुहूने बॅडमिंटनमध्ये आपले नाव कमावले आहे. त्याचसोबत आता तीने युपीएससीच्या परिक्षेत यश मिळवून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. कुहूने युपीएससी परिक्षेत 178 क्रमांक मिळवला आहे.

कुहूचे वडिल अशोक कुमार यांनी तिच्या कामगिरीची खूप कौतुक केले आहे. अशोक कुमार यांनी आजतक या चॅनलला मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी कुहूचे खूप कौतुक केले आहे. 'बॅडमिंटनच्या खेळात झालेल्या दुखापती आणि मेहनतीने तिला शिस्त लावले आहे. बॅडमिंटन हे तिच्या यूपीएससीच्या यशाचे कारण बनले आहे. कुहूने दिवसाचे १६-१६ तास यूपीएससीचा अभ्यास केला. काही लोक ८ तास अभ्यास करुनही यूपूएससी परिक्षेत यश मिळवतात', असे त्यांनी सांगितले

कुहू गर्ग (Kuhoo Garg)यांचे प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ, डेहराडून येथून झाले आहे. तिने दिल्लीतील एसआरसीसी कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले.

Kuhoo Garg
Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाने सोशल मीडियावरून ४ राजकीय पक्षांच्या पोस्ट हटवल्या; काय आहे प्रकरण?

कुहूला बॅडमिंटन खेळाचा तिला तिच्या अभ्यासात आणि मुलाखतीत खूप जास्त उपयोग झाल्याचेही अशोक कुमार यांनी सांगितले. बॅडमिंटनपट्टू नसती तर कदाचित यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण करणे खूप जास्त अवघड झाले आहे. मेहनत करण्याची ताकद आणि शिस्त नसती, असेही कुहूने सांगितले.

कुहूचे वडील अशोक कुमार हे २०२०-२३ पर्यंत उत्तराखंडचे डीजीपी होते. अशोक कुमार यांनी आयआयटी दिल्लीतून इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. कुहूची आई प्रोफेसर आहे. तर कुहूचे दोन भाऊ सध्या शिक्षण घेत आहेत.

Kuhoo Garg
Rahul Gandhi: पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे चॅम्पियन; राहुल गांधीचा भाजपवर हल्लाबोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com