प्रमोद जगताप साम टीव्ही, मुंबई
देशामध्ये लोकसभा निवडणूकांची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर सोशल मीडियावरून काही राजकीय पक्षांच्या पोस्ट हटवल्या गेल्या आहेत. निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोस्ट हटवण्याचे आदेश दिले होते.
निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आदेशानंतर X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काही राजकीय पक्षांच्या पोस्ट हटवल्या गेल्या आहेत. यामध्ये वायएसआर काँग्रेस, आम आदमी पार्टी, तेलगू देसम पार्टीचे चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या पोस्टचा समावेश आहेत. सोशल मीडियावरून चार राजकीय पक्षांच्या पोस्ट हटवण्यात आल्या (Lok Sabha Election) आहे.
आचारसंहितेच उल्लघंन झाल्यामुळं निवडणुकीच्या कालावधीत या पोस्ट हटवण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने 10 एप्रिल रोजी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मेल पाठवत या पोस्ट हटवण्यास ( Political Parties Post) सांगितलं होतं. त्या अनुषंगाने कारवाई करत या पोस्ट हटवण्यात आल्या आहे. निवडणूकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे.
देशात लोकसभा निवडणूकांचं वारं वाहत आहेत. सर्व पक्ष निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार, सभा, दौरे यांची जोरदार तयारी करत आहे. निवडणूक आयोग लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने (Election Commission's Order) सर्वच राजकीय पक्षांवर अगदी बारीक लक्ष ठेवून असल्याचं दिसच आहे. राजकीय नेत्यांच्या भाषणापासून त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर निवडणूक आयोगाचे लक्ष असल्याचं दिसत आहे. कारण नुकतंच निवडणूक आयोगाने प्लॅटफॉर्म X ला चार राजकीय पक्षांचे पोस्ट काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
वायएसआर काँग्रेस, आम आदमी पार्टी, एन चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडून सोशल मीडियावर संबंधित पोस्ट टाकण्यात आल्या होत्या. निवडणूक आयोगाने सांगितलं की, या सर्व सोशल मीडिया पोस्ट आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन (Code of Conduct) करतात. त्यामुळे त्या हटवण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.