Maharashtra Lok Sabha Election Phase 1 : महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात प्रचाराचा ताेफा आज थंडावणार; काॅंग्रेससह शिवसेनेचा राेड शाे, गडकरींची सोशल मीडियास पसंती

आज उत्तर गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त भागातील 80 पोलिंग पार्ट्याचे 160 मतदान कर्मचारी हेलिकॉप्टरच्या साह्याने मतदान केंद्रावर पोहचविण्यात येत आहे.
maharashtra lok sabha polls 2024 phase 1 voting date constituency all you need to know
maharashtra lok sabha polls 2024 phase 1 voting date constituency all you need to knowSaam Digital

- मंगेश भांडेकर

Lok Sabha Election 2024 :

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघासह पूर्व विदर्भात गेल्या पंधरा दिवसांमध्ये प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपच्या फैरी झडल्या. येत्या 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. यामध्ये गडचिरोली-चिमूर, रामटेक, नागपूर, भंडारा-गाेंदिया, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. परिणामी आज (बुधवार) दुपारी तीन नंतर पाचही मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

गडचिरोली येथे काँग्रेसकडून सिने अभिनेत्रीचा आज रोडशो असणार आहे. भाजपकडून गडचिरोली शहरातून रॅली काढण्यात येणार आहे. यामुळे आज गडचिराेलीत राजकीय धुळवड पाहण्यास मिळणार आहे. दरम्यान दुपारी तीन नंतर प्रचार थंडावणार असून गुप्त प्रचाराला जोर येणार आहे.

maharashtra lok sabha polls 2024 phase 1 voting date constituency all you need to know
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसांत जमा करावी लागणार महत्वाची माहिती, जाणून घ्या आदेश

उत्तर गडचिरोलीतील 80 पोलिंग पार्ट्या हेलिकॉप्टरने रवाना

आज उत्तर गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त भागातील 80 पोलिंग पार्ट्याचे 160 मतदान कर्मचारी हेलिकॉप्टरच्या साह्याने मतदान केंद्रावर पोहचविण्यात येत आहे. काल दक्षिण गडचिरोली भागातील 68 अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त मतदान केंद्रावर 295 मतदान कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आले होते. गडचिरोलीत निवडणुकीसाठी एअर फोर्सचे 5 तर आर्मीचे 2 हेलिकॉप्टर दिमतीला असून हेलिकॉप्टरच्या साह्याने कालपासून पोलिंग पार्ट्या बेस कॅम्पवर रवाना केले जात आहे.

maharashtra lok sabha polls 2024 phase 1 voting date constituency all you need to know
RTE Admission : पालकांनाे! ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ; ऑनलाइन अर्ज करण्यासाठी जाणून घ्या संकेतस्थळ

रामटेकमध्ये मुख्यमंत्री

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरत असून रामटेक लोकसभा मतदारसंघात ते प्रचाराचा शेवटच्या दिवशी रोड शो करणार आहेत. उमरेड आणि हिंगणामध्ये प्रचार करुन मुख्यमंत्री हे भागातील राम मंदिरात जाऊन प्रभू रामाला साकडं घालणार असल्याचे समजते. शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशी मॅरेथॉन भेटीगाठी हाेणार आहेत.

गडकरींचा आज समाज माध्यामावरुन प्रचार

नागपूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून नागपूरकरांशी संवाद साधणार आहे. प्रचाराचे अखेरचे काही तास शिल्लक असताना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अखेरच्या दिवशी रॅली न काढता थेट गडकरींनी डिजिटल संवाद साधण्यावर भर दिला आहे. गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाचं लेखाजोखा मांडत गडकरी जनतेला मतदानाचे आवाहन करणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

maharashtra lok sabha polls 2024 phase 1 voting date constituency all you need to know
Bhandara Gondia Lok Sabha Constituency: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी उदंड प्रतिसाद, 1243 मतदारांनी बजावला हक्क

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com