Rahul Gandhi: पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे चॅम्पियन; राहुल गांधीचा भाजपवर हल्लाबोल

Rahul Gandhi Criticized PM Modi: आज गाझियाबादमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी माध्यमांशी बोलताना राहुल गांधीनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
Rahul Gandhi Criticized PM Modi
Rahul Gandhi Criticized PM ModiSaam Tv

प्रमोद जगताप साम टीव्ही, मुंबई

आज गाझियाबादमध्ये राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) आणि अखिलेश यादव यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी माध्यमांशी बोलताना राहुल गांधीनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत, असं वक्तव्य केलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.

यावेळी बोलताना राहुल गांधीनी सर्वांना राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. ही निवडणुक विचारधारेची निवडणूक असल्याचं त्यांनी म्हटले. निवडणुकीत अनेक मोठे मुद्दे आहेत. त्यात सगळ्यात मोठे (Rahul Gandhi Criticized PM Modi) बेरोजगारी, महागाई हे मुद्दे आहेत. मोदींकडून या सगळ्यांना बगल देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे मुद्दे आहेत त्यावर भाजप, पंतप्रधान यापैकी कोणीच बोलत नाहीत, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी ANI ला दिलेली मुलाखत स्क्रिप्टेड होती. इलेक्ट्रोल बॉंण्ड योग्य होते असे म्हणता, मग ते सुप्रीम कोर्टाने का रद्द केले ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ज्यांनी तुम्हाला पैसे दिले त्यांचे नाव, तारखा तुम्ही का लपवल्या? असं देखील राहुल गांधी म्हणाले आहेत. सीबीआय, इडीकडून कुठल्या कंपनीवर कारवाई सुरू (Rahul Gandhi and Akhilesh Yadav press conference) झाली, की त्या कंपन्या काही दिवसांत भाजपला कोट्यावधी रुपये देतात, असा आरोप त्यांनी केला आहे. इलेक्ट्रोल बॉंण्ड हा जगातील सगळ्यात मोठा स्कॅम आहे. काँग्रेसचे अध्यक्ष जे आदेश देतील, ते मी ऐकेल, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

अध्यक्षांनी मला अमेठीतून लढायला सांगितलं, तर मी लढेल. आमच्याकडे सीईसी मिटींगमध्ये तिकीटाचे निर्णय होतात. किती जागा निवडून येतील, ते तर मी सांगू शकत नाही. भाजप 180 पर्यंत जाईल असं ((Rahul Gandhi News) वाटत होतं. पण, आता भाजप 150 पर्यंत येईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. देशातील युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, हा प्रमुख मुद्दा (Lok Sabha 2024) आहे. त्यासाठी आम्ही आमच्या जाहिरनाम्यात काही कल्पना मांडल्या आहेत.

Rahul Gandhi Criticized PM Modi
Rahul Gandhi Speech : राहुल गांधींची मोठी घोषणा; महिलांच्या खात्यात महिन्याला जमा करणार 8500 रुपये

सध्या 30 लाख सरकारी जागा आहेत. त्या मोदींनी भरल्या नाहीत. आम्ही त्या सगळ्या जागा भरू. पेपर लिक होऊ नये, यासाठी कायदा बनवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी दोन गोष्टी मागितल्या आहेत. शेतीमालाला (Rahul Gandhi Press Conference) योग्य भाव आणि जसं मोठ्या उद्योगपतींच कर्ज माफ केलं, तसं आमच कर्ज माफ करा. ते आम्ही करू, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं आहे.

जाहीरनामा जरी काँग्रेसचा असला तरी त्यातील आयडीया इंडिया आघाडीच्या आहेत. आम्ही एकमेकांशी बोलून काम करतो, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. तर अखिलेश यादव यांनी खोट बोलणं आणि देशाला लुटणं हा भाजपचा अजेंडा असल्याचं म्हटलं आहे.

Rahul Gandhi Criticized PM Modi
Rahul Gandhi: देशाच्या राष्ट्रपतींना राम मंदिराच्या उद्घाटनात येऊ दिलं नाही, कारण त्या आदिवासी आहे; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com