राज्यात कंत्राटी पद्धतीने १८१०६ पदांसाठी शिक्षक भरती
२० पेक्षा कमी पट शाळेत केली जाणार भरती
१८ हजारांपेक्षा जास्त शाळेत भरती
शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता राज्यात कंत्राटी शिक्षक भरती केली जाणार आहे. संचमान्यतेचा १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाला उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. आता दहापेक्षा कमी पट असलेल्या शाळेत १ शिक्षक तर २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळेत १ नियमित आणि १ कंत्राटी शिक्षक नेमण्यात येणार आहे. या आकडेवारीनुसार राज्यात १८ हजार १०६ शाळांवर आता कंत्राटी पद्धतीने शिक्षण नेमण्यात येणार आहे.
राज्यात जवळपास १८ हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये मुलांचा पट २० पेक्षा कमी आहे. त्यामुळे आता लवकरच शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहेत.
संचामन्यतेच्या निर्णयानुसार माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता नववी ते दहावीच्या वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तेथे आता शिक्षक अतिरिक्त होणार आहे. या समायोजनासाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या निर्णयानुसार आता राज्यातील ६४० शाळांमधील तीन हजार शिक्षकांना समायोजित करावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या एकूण ६४,००० शाळा आहेत. यामध्ये दहा पेक्षा कमी पटाच्या ८,०८९ शाळा आहेत. तर २० पेक्षा कमी पटाच्या शाळात १८,१०६ आहेत. त्यानुसार आता १८,१०६ शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती केली जाणार आहे.
माध्यमिक शाळेच्या ५ ते ८ वीसाठीही कंत्राटी भरती
खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये जर नववी आणि दहावीच्या वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. त्या शिक्षकांचे दुसरीकडे समायोजन केले जाणार आहे. परंतु पाचवी ते आठवीच्या वर्गातील शिक्षकांचे काय होणार याबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. परंतु त्या वर्गांवरील नियमित शिक्षक अतिरिक्त होतील. कंत्राटी शिक्षकच घ्यावे लागतील, असं सूत्रांनी माहिती दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.