ZP Teachers Salary: जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांची "दिवाळी होणार गोड"; सरकारचा मोठा निर्णय

Graduate ZP Teachers Salary : महाराष्ट्र सरकारने ७ व्या वेतन आयोगाअंतर्गत पदवीधर जिल्हा परिषद शिक्षकांसाठी वेतन विसंगती सुधारणांना मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
Graduate ZP Teachers  Salary
Zilla Parishad teachers celebrate as Maharashtra government corrects pay anomalies under the 7th Pay Commissionsaam tv
Published On
Summary
  • महाराष्ट्र सरकारनं पदवीधर शिक्षकांच्या वेतन त्रुटी दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • सातव्या वेतन आयोगाच्या सुधारणांनंतर काही शिक्षकांचे वेतन कमी झालं होते.

  • शिक्षक संघटनांच्या मागणीला सरकारनं प्रतिसाद दिला आहे.

देशात आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू आहे. त्याच दरम्यान महाराष्ट्र सरकारनं सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या त्रुटी दूर केल्या आहेत. या अंतर्गत राज्य सरकारने पदवीधर वेतन त्रुटी निवारण लागू करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

Graduate ZP Teachers  Salary
Nashik Crime: नाशिक जिल्हा....; पुस्तकांऐवजी बॅगेत कोयता अन् चॉपर, महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे फॅड

सातव्या वेतन आयोगाच्या सुधारणांनंतर काही पदवीधर शिक्षकांचे वेतन पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे त्यांच्यात अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली होती. वेतनातील ही त्रुटी निवारण व्हावी याकडे विधानसभा अधिवेशनात आमदार महेश लांडगे यांनी सरकारचे लक्ष वेधले होते. महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या माध्यमातून या संदर्भात पत्र व्यवहार देखील केला होता.

Graduate ZP Teachers  Salary
शिक्षक की सावकार? गुरुजी आयटीच्या रडारवर, हजारो शिक्षकांची 'ITR'मधील चलाखी

त्यानंतर सरकारने ही वेतन निश्चितीमधील त्रुटी दूर करण्याचा निर्णय घेतला. यात पात्र शिक्षकांना न्याय मिळणार आहे. या निर्णयामुळे पदवीधर शिक्षकांचे वेतन सुधारित वेतनश्रेणीनुसार निश्चित केले जाणार आहे. त्यांना जुन्या वेतनापेक्षा कमी वेतन मिळणार नाही. दरम्यान वेतनत्रुटी समितीच्या अनुशंगाने वित्त विभागाकडून शासन निर्णय काढण्यात आला होता. पण ग्रामविकास विभागाचा शासन निर्णयाची प्रतिक्षा होती.

त्याचमुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनत्रुटीत सुधारणा रखडली होती. वेतनत्रुटी निवारण समिती 2024 च्या अहवालातील वेतनश्रेणी विषयक आणि अनुषांगिक शिफारशी लक्षात घेत ग्रामविकास विभागाने या संदर्भात आदेश पारित केलाय. महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकारी दिपाली पवार यांच्या आदेशाने हा निर्णय लागू करण्यात आलाय. या निर्णयामुळे पात्र पदवीधर शिक्षकांना योग्य वेतनश्रेणी लागू होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com