
महाराष्ट्रातील हजारो शिक्षक आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत.
खोट्या पावत्यांवर कर परताव्याचे दावे केल्याचं उघड
आयकर विभागाने ‘सेक्शन 131 (1A)’ अंतर्गत शिक्षकांना समन्स बजावले आहेत.
शाळेच्या कामासोबतच गुंठेवारी, प्लॉट्स, व्यापार, एजंटगिरी करून 'गब्बर' झालेले काही 'मास्तर' आता इन्कम टँक्सच्या छडीला कसं तोंड देणार ? हा प्रश्न यासाठी कारण पोरांना शिकवणारे आपले 'गुरुजीं' आता आयकर विभागाच्या कचाट्यात सापडलेत राव! गेल्या वर्षीच्या रिटर्नमध्ये काही शिक्षकांनी खोट्या कारणांवरून टॅक्स परतावा मागितल्याचं उघड झालंय. त्यामुळे राज्यातल्या हजारो शिक्षकांना 'सेक्शन 131 (1 ए)' खाली समन्स आले आहेत.
सगळ्या कागदपत्रांसह हिशोब द्यायला त्यांना कार्यालयात हजर व्हायला सांगितलं आहे. या नोटिशीमुळे हजारो 'मास्तर' सीए आणि टॅक्सवाल्यांच्या दारात उभे आहेत.
मास्तरांची 'ITR'मधील चलाखी
खोट्या भाडे पावत्या
घरभाड्याची सूट म्हणजे HRA मिळवण्यासाठी आई-बाप किंवा नातेवाईकांना भाडे दिल्याच्या खोट्या पावत्या जोडल्या.
गृहकर्जाचे खोटे सर्टिफिकेट
कर्ज नसतानाही व्याजाची सूट लाटली
डबल वजावट
एकाच गुंतवणुकीचा फायदा दोन-दोन ठिकाणी घेऊन जास्त रिफंड मिळवण्याचा प्रयत्न केला.
बनावट वैदयकीय खर्च
खोट्या वैद्यकीय बिलांच्या पावत्या लावून करपात्र उत्पन्न कमी दाखवलं
'टॅक्स मॅनेजमेंट'च्या नावाखाली जी 'चलाखी' सुरू होती, तिचा बुरखा आता फाटलाय. फक्त शिक्षण खातं नाही, तर दुसऱ्या सरकारी आणि खाजगी विभागांमध्ये ही हाच 'कारभार' सुरू आहे. त्यामुळे अलर्ट हो जाओ दोस्तो
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.