Nashik Crime: नाशिक जिल्हा....; पुस्तकांऐवजी बॅगेत कोयता अन् चॉपर, महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे फॅड

College Boys Carry Weapons Bag: नाशिकमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या बॅगमधून चॉपर आणि चाकू घेऊन जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. तरुणांमध्ये वाढत्या "भाईगिरी" ट्रेंडमुळे शाळांमध्ये गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
College Boys Carry Weapons Bag
Police seize choppers and knives from students’ school bags in Nashiksaam tv
Published On
Summary
  • नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या बॅगेत कोयते आणि चॉपर आढळल्याने खळबळ.

  • सोशल मीडियावर भाईगिरी

  • पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली.

पुण्यानंतर नाशिकमध्ये भाईगिरी आणि गुंडगिरी वाढलीय. सोशल मीडियावर रिल बनवून भाईगिरीचे व्हिडिओ बनवत आहेत. नाशिक जिल्हा म्हणजे गुन्हेगारीचा बालेकिल्ला अस म्हणत सोशल मीडियावर रिल बनवण्यावऱ्या मुलींवर कारवाई केल्यानंतर आता एक धक्कादायक बाब समोर आलीय.

एका विद्यार्थ्यांच्या बँगेतच कोयता, चॉपर असल्याचा धक्कादायक प्रकार गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकाजवळ घडकीस आलाय.त्यामुळे आता शाळेतील मुलांमध्येही भाईगिरीचं फॅड शिरले आहे, का असा प्रश्न निर्माण होतोय. पोलिसांनी गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकाजवळच्या उड्डाणपुलाखाली संशयित दोन विद्यार्थ्यांच्या पाठीवरील 'बॅग'ची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्या दप्तरमध्ये चॉपर, कोयता सापडला.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका १८ वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतलंय. दुसऱ्या विधीसंघर्षित बालकाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आलीय. टागोरनगरमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पाठीवर असलेल्या बॅगमध्ये शंभर रुपयांचा चॉपर मिळून आलाय तर दुसऱ्या एका मुलाच्या बॅगेत कोयता आढळून आलाय. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी याबाबत दोघांना विचारणा केली. त्यावेळी 'हे शस्त्र आमचे नसून मित्रांनी आमच्याकडे ठेवायला दिले असं उत्तर दिलं आहे.

College Boys Carry Weapons Bag
वर्गात फटकारलं, विद्यार्थ्यांची सटकली; शिक्षकाच्या गर्भवती पत्नी अन् २ मुलींना संपवलं, दिवसा रक्तरंजित थरार

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणलं. या दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना याबाबत माहिती देण्यात आली. दोघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. गुन्हेगारांना धडा शिकविण्यासाठी शहर पोलिसांनी राजकीय गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.

College Boys Carry Weapons Bag
Crime : काम देतो म्हणत नेलं, सामूहिक अत्याचारानंतर बेदम मारलं; अमानुष छळामुळे आदिवासी महिलेचा मृत्यू

महिला रील स्टारची गुन्हेगारी भाषा

देवळाली पोलिसांनी गुन्हेगारीची भाषा करणाऱ्या तरुणींना खाकीचा प्रसाद दिला. नाशिकच्या 2 तरुणींनी रामकुंड परिसरात गुन्हेगारीची भाषा करणारी रील्स शूट केले होते. पोलिसांनी भाईगिरी करणाऱ्या तरुणींचा शोध घेत पोलिसी खाक्या दाखवला आणि अवघ्या 2 मिनिटात तरुणींची भाईगिरी बाहेर काढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com