वर्गात फटकारलं, विद्यार्थ्यांची सटकली; शिक्षकाच्या गर्भवती पत्नी अन् २ मुलींना संपवलं, दिवसा रक्तरंजित थरार

Minors Kill Teacher’s Family Over Scolding: बागपत जिल्ह्यात दोन विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या गर्भवती पत्नी आणि दोन मुलींची हत्या केली.
Minors Kill Teacher’s Family Over Scolding
Minors Kill Teacher’s Family Over ScoldingSaam Tv
Published On
Summary
  • विद्यार्थ्यांकडून शिक्षकाच्या गर्भवती पत्नी अन् २ मुलींची हत्या.

  • शिक्षकाने फटकारल्यामुळे संतापून केलं कृत्य.

  • पोलिसांनी कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या.

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दोन अल्पवयीन मुलांनी त्यांच्या शिक्षकाच्या पत्नी आणि दोन मुलींची हत्या केली. शिक्षकाने दोन्ही विद्यार्थ्यांना फटकारले होते, याच कारणामुळे संतापलेल्या दोन्ही विद्यार्थ्यांनी शिक्षकाची गर्भवती पत्नी आणि दोन मुलींची हत्या केली. या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

मौलाना इब्राहिमची पत्नी इसराना, मुलगी सोफिया आणि सुमय्या या तिघांचा भीषण हल्ल्यात मृत्यू झाला. मौलाना इब्राहिम आपल्या परिवारासोबत बागपतच्या गंगनोली गावातील रहिवासी होते. या तिघांचे मृतदेह निवासस्थानी (मशिद) आढळले. मौलाना मशिदीत विद्यार्थ्यांना धडे शिकवायचे, ते शिक्षक होते.

Minors Kill Teacher’s Family Over Scolding
लेकीच्या प्रेम विवाहाला कडाडून विरोध, जावईच्या आईला जिवंत जाळलं, मुलीच्या आई - वडिलांचा प्रताप

घटनेच्या दिवशी मौलाना देवबंदमध्ये तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमीर खान मुक्ताकी यांची भेट घेण्यासाठी गेले होते. परतल्यानंतर मशिदीच्या वरच्या खोलीत मौलानाची गर्भवती पत्नी आणि दोन्ही मुलींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. फॉरेन्सिक पथकांनी खोल सील केली.

Minors Kill Teacher’s Family Over Scolding
निवडणुकीपूर्वी माजी रेल्वे मंत्र्यांच्या परिवाराला धक्का, IRCTC हॉटेल प्रकरणात अख्ख कुटुंब अडकणार

पोलिसांच्या तपासात हे कृत्य मौलानाच्या दोन विद्यार्थ्यांनी केलं असल्याचं उघड झालं. शनिवारी मौलाना यांनी शिकवत असताना दोन्ही मुलांना शिक्षा दिली होती. काही तासांनंतर मौलाना बाहेर आले. अल्पवयीन मुली मशिदीत परतली. हातोडा आणि चाकूने अल्पवयीन मुलांनी मौलानाच्या गर्भवती पत्नीवर वार केले. नंतर दोन्ही मुलींवरही वार केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चार तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com