Transport Minister Pratap Sarnayak inspecting the Solapur ST Stand before ordering the depot chief’s suspension. 
महाराष्ट्र

Solapur News : एका कानानं एकलं, दुसऱ्या कानानं सोडून दिलं; आगारप्रमुख 'ऑन द स्पॉट सस्पेंड'

Depot Head Suspended for Negligence: सोलापूरच्या एसटी स्टॅन्डची अवस्था पाहून परिवहन मंत्र्यांचा संताप अनावर झाला. त्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांनी आगार प्रमुखांना निलंबित केलंय.

Bharat Jadhav

  • एसटी स्टॅन्ड हे अस्वच्छतेचे आगार बनलं होतं.

  • आगार प्रमुखला मंत्र्यांनी केलं जागेवर निलंबित

  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली कारवाई

राज्यात निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागलेत. नेतेमंडळी प्रचारसभेत आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतलेत. त्याचवेळी राज्याचे परिवहन मंत्र्यांनी कार्यवाहीचा धडाका लावलाय.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अॅक्शन मोडवर आलेत. राज्यातील बस स्थानकांना भेट देत तेथील कारभाराचा आढावा घेत आहेत. दुसरीकडे सूचना ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांचं जागेवर निलंबित करत त्यांना थेट घराचा दाखवत आहेत. बस स्थानकांवरील स्वच्छता, तेथील कारभार सुरळीत नसेल तर मंत्री महोदय अधिकाऱ्यांची खैर करत नाहीयेत.

राज्यात निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागलेत. नेतेमंडळी प्रचारसभेत आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतलेत. त्याचवेळी राज्याचे परिवहन मंत्र्यांनी कार्यवाहीचा धडाका लावलाय.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अॅक्शन मोडवर आलेत. राज्यातील बस स्थानकांना भेट देत तेथील कारभाराचा आढावा घेत आहेत. दुसरीकडे सूचना ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांचं जागेवर निलंबित करत त्यांना थेट घराचा दाखवत आहेत. बस स्थानकांवरील स्वच्छता, तेथील कारभार सुरळीत नसेल तर मंत्री महोदय अधिकाऱ्यांची खैर करत नाहीयेत.

प्रताप सरनाईक यांनी आठवडाभरापूर्वी सोलापूरच्या स्टॅन्डला भेट दिली होती. त्यावेळी सरनाईक यांनी सोलापूर बस स्टॅन्डची पाहणी केली होती. त्यावेळी एसटी स्टॅन्ड हे अस्वच्छतेचे आगार बनल्याचे मंत्र्याच्या लक्षात होते. आठवडाभरात सुधारणा करण्याच्या सूचना मंत्र्यांनी आगार प्रमुखाला दिल्या होत्या. मात्र त्यानंतर देखील सुधारणा न झाल्याने अखेर परिवहन मंत्र्यांनी आगार व्यवस्थापक उत्तम जोंधळे याना निलंबित करण्याचे आदेश दिलेत.

मागच्या आठवड्यात मी अचानक आल्यावर प्रचंड भयानक आणि विदारक अवस्था दिसली. सोलापूर एसटी स्टॅन्ड हे अस्वछतेचे आगार बनले होते, पिण्याच्या पाण्याची ठिकाणी देखील स्वच्छता नव्हती. प्रत्येक वेळी कारवाई करणे योग्य नाही, म्हणून मी आठवडाभरात सुधारणा करण्याची सूचना दिली होती,पण तरीही परिस्थिती बदलली नसल्यानं कारवाई करण्यात आली असं सरनाईक म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या आज आर्थिक समस्या सहज दूर होतील; जाणून घ्या राशीभविष्य

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

SCROLL FOR NEXT