MSRTC's 'Laal Pari' buses will now run on the roads in an electric avatar. saam tv
महाराष्ट्र

MSRTC BUS: लालपरी बदलणार रुप; रस्त्यावर धावणार नव्या अवतारातील 22 हजार बस, कशा असतील नवीन ST बस जाणून घ्या

MSRTC BUS: पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. MSRTC च्या बसेसचा संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्याची योजना सरकारने आखली आहे. सर्व बस टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Bharat Jadhav

  • सुमारे २२ हजार बस इलेक्ट्रिक करण्यात येणार आहेत.

  • महाराष्ट्र पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीत आघाडीवर येईल

  • ‘लालपरी’ बस आता पर्यावरणपूरक अवतारात दिसणार.

एसटी बस राज्यातील ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजली जाते. गावा-गावात जाणारी लालपरी आता नवं रुपात दिसणार आहे. राज्य सरकारने आपल्या धोरणात बदल करत लालपरीचे परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस येत्या काही वर्षांत पर्यावरणपूरक केल्या जाणार आहेत.

एसटीच्या ताफ्यातील सर्व २२ हजार बस पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारचे आहे. पुढील काही वर्षात सर्व रस्त्यांवर इलेक्ट्रिक बस धावताना दिसतील. दरम्यान देशात २०४७ पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक मोबिलिटीचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प पंतप्रधान पंतप्रधान मोदी यांनी मांडला आहे, तर राज्यातही या दिशेने पावले उचलली जाऊ लागली आहेत.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली आहे. सरनाईक यांच्या माहितीनुसार, सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण २२ हजार बस आहेत आणि त्यापैकी सुमारे ८००बस इलेक्ट्रिक आहेत. उर्वरित सर्व बस टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्यात येतील. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारी बस सेवा पूर्णपणे इलेक्ट्रिक करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याआधी पुढील पाच वर्षांत दरवर्षी ५ हजार डिझेल बस खरेदी करण्याची होती. मात्र पर्यावरणपूरक वाहतुकीवर भर देत सरकारने आपल्या धोरणात बदल केला आहे. सध्या सुरू असलेल्या ८ हजार डिझेल बसेसच्या खरेदीपलीकडे भविष्यातील सर्व बस इलेक्ट्रिक असतील, यावर सरकारचा भर असेन. सध्या वापरात असलेल्या डिझेल बसेसचेही इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करण्याची योजना तयार करण्यात आल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

या मोठ्या प्रकल्पासाठी राज्यभरात चार्जिंग सुविधाही उभारल्या जाणार आहेत. चार्जिंग स्टेशनसाठी सौर उर्जेचा वापर करण्याचा प्रस्ताव सरकारने तयार केला आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक ऊर्जा वापर वाढेल आणि पारंपरिक वीज ग्रिडवरील अवलंबित्वही कमी होईल. इलेक्ट्रिक वाहनामुळे राज्याला आर्थिक फायदाही होईल. कर सवलत आणि टोल माफीमुळे मोठी बचत होणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांना मुंबई पुणे एक्सप्रेस वे, नागपूर समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू या प्रमुख मार्गांवर टोलमाफी देण्यात येणार आहे. राज्य सरकार महामार्गांवर दर २५ किलोमीटर अंतरावर चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमांनाही प्रोत्साहन दिले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात सिलेंडरचा काळाबाजार, शहरातील दीडशे ठिकाणी दीडशे ठिकाणी छापेमारी

परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे निलंबित; प्रशासनाकडून मोठी कारवाई, धक्कादायक कारण समोर

Drinking Water: जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराचं नुकसान होतं? ही माहिती वाचून बसेल धक्का

पुलावरून थरारक उडी! तापी नदीत बुडून 40 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

KDMC : कल्याण-डोंबिवलीत भूमिपुत्रांची पालिकेवर धडक! २७ गावांचा क्लस्टर योजनेला विरोध, कारण काय?

SCROLL FOR NEXT