Appendix cancer: पोट फुगीमागे लपलाय अपेंडिंक्सचा कॅन्सर? 'ही' 5 लक्षणं दिसली तर समजा सुरुवात झालीये

Surabhi Jayashree Jagdish

अपेंडिक्सचा कॅन्सर

अपेंडिक्समध्ये तयार होणाऱ्या घातक गाठींना अपेंडिक्सचा कॅन्सर असं म्हटलं जातं. हा आजार दुर्मिळ असल्यामुळे त्याची लक्षणं सुरुवातीच्या टप्प्यात सहज ओळखता येत नाहीत. अनेकदा अपेंडिसायटिस किंवा अपेंडिक्सच्या सूजेसाठी शस्त्रक्रिया केल्यानंतर काढलेल्या ऊतींच्या तपासणीत कॅन्सरचं निदान होतं.

Appendix cancer warning signs | saam tv

सतत पोटदुखी

खालच्या उजव्या बाजूला वारंवार किंवा सतत पोटदुखी जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. अपेंडिक्सशी संबंधित काही गाठींमुळे पोटात वेदना किंवा सतत अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

Appendix cancer bloating | saam tv

वारंवार पोट फुगणं

अपेंडिक्सच्या काही प्रकारच्या गाठींमुळे कालांतराने पोटाचा आकार वाढू शकतो. सुरुवातीला हा बदल साधे ब्लोटिंग किंवा वजन वाढल्यासारखा वाटू शकतो. पोट सतत किंवा हळूहळू अधिक फुगत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Persistent bloating | saam tv

कमी खाऊनही पोट भरल्यासारखं वाटणं

काही रुग्णांना थोडेसं अन्न खाल्ल्यानंतरही नेहमीपेक्षा लवकर पोट भरल्यासारखं वाटू शकतं. पोटाच्या आकारात वाढ किंवा पोटातील इतर बदलांमुळे अशी भावना निर्माण होऊ शकते.

Lower right abdominal pain | saam tv

विनाकारण वजन कमी होणं

आहार किंवा जीवनशैलीत विशेष बदल नसतानाही वजन कमी होत असेल तर त्यामागील कारण शोधणं आवश्यक आहे. सतत बद्धकोष्ठता होणं किंवा वारंवार जुलाब होणं यांसारखे आतड्यांच्या हालचालीतील बदलही तपासण्याची गरज निर्माण करू शकतात.

Bloating and cancer | saam tv

मळमळ-उलटी

ठोस कारण नसताना वारंवार मळमळ किंवा उलटी होत असेल तर त्याची वैद्यकीय कारणं तपासणं गरजेचं आहे. काही रुग्णांमध्ये पोटात असामान्य गाठ किंवा सूज जाणवू शकते. अशी लक्षणं अनेक आजारांमध्ये दिसू शकतात.

Appendix cancer detection | saam tv

निदानासाठी तपासणी महत्त्वाची

अपेंडिक्समध्ये गाठ असल्याचा संशय आल्यास डॉक्टर CT स्कॅन किंवा MRI सारख्या इमेजिंग चाचण्यांच्या मदतीने पोटातील परिस्थिती आणि आसपासच्या अवयवांची तपासणी करू शकतात. मात्र कॅन्सरचा प्रकार निश्चित करण्यासाठी काढलेल्या पेशींची हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणी महत्त्वाची ठरते.

MRI appendix cancer | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Digestive health | saam tv

Chia seeds: सकाळ की संध्याकाळ? वजन कमी करण्यासाठी कधी खावेत चिया सिड्स?

Healthy diet | saam tv
येथे क्लिक करा