Surabhi Jayashree Jagdish
चिया सीड्समध्ये भरपूर फायबर, प्रोटीन आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असल्यामुळे ते वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतात. पाण्यात भिजवल्यानंतर ते फुगतात त्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं आणि कॅलरीचे सेवन कमी होऊ शकते.
सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यासोबत चिया सीड्स घेतल्यास दुपारपर्यंत पोट भरल्यासारखं राहण्यास मदत होते. त्यामुळे सकाळच्या वेळेत वारंवार स्नॅक्स किंवा जंक फूड खाण्याची इच्छा कमी होऊ शकते.
चिया सीड्समधील फायबर पचनसंस्था एक्टिव्ह राहण्यास मदत होते. नियमित सेवनामुळे शौचाची क्रिया सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास हातभार लागू शकतो.
संध्याकाळी किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासोबत चिया सीड्स घेतल्यास उशिरा भूक लागणं आणि अनावश्यक स्नॅक्स खाण्याची सवय कमी होऊ शकते. त्यामुळे रात्री जास्त कॅलरी घेण्याचा धोका कमी होतो.
रात्री चिया सीड्समधील फायबर पचनक्रियेला मदत करतात. संध्याकाळच्या खाल्लास रात्रीचं जेवण कमी प्रमाणात घेतलं जातं. त्यामुळे वजन नियंत्रणासाठी आवश्यक असलेले कॅलरी संतुलन राखणे सोपे जाऊ शकते.
एक ग्लास पाण्यात सुमारे एक टेबलस्पून चिया सीड्स २० ते ३० मिनिटे भिजवून त्याचं सेवन करणं हा एक सोपा पर्याय आहे. ते दही, स्मूदी किंवा ओट्समध्ये मिसळूनही खाऊ शकता.
सकाळी वारंवार भूक लागते किंवा दिवसभर ऊर्जा हवी असेल तर सकाळी चिया सीड्स खाणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. रात्री उशिरा खाण्याची सवय असेल किंवा रात्रीची भूक नियंत्रित करायची असेल तर संध्याकाळी सेवन करणं अधिक योग्य ठरू शकतं.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.