Pandharpur News : बदलत्या जागतिक धोरणांमुळे आणि मंदीमुळे राज्यातील सुमारे 300 सुतगिरण्या (Spinning Mills) आर्थिक अडचणीत आल्या आहेत. राज्य सरकारने राज्यातील वस्त्रोद्योग वाचवण्यासाठी मदत करावी अन्यथा सर्व सुतगिरण्या 1 जुलै पासून बंद ठेवण्यात येतील असा इशारा राज्य स्पिनिंग मिल असोसिएशनचे (maharashtra state spinning milling association) सचिव संजय जमदाडे यांनी दिला आहे. (Maharashtra News)
कृषी प्रक्रिया उद्योगाशी निगडीत असलेल्या सुतगिरण्यांवर सुमारे चार ते साडेचार लाख कुटुंब (family) अवलंबून आहेत. दरम्यान मागील काही दिवसांपासून आर्थिक मंदीमुळे सुतगिरण्या अडचणीत आल्या आहेत.जागतिक बाजारात सुताचे दर पडल्याने हजारो टन सूत विक्री अभावी पडून आहे. प्रक्रिया खर्चात मोठी वाढ झाली आहे.
परिणामी अनेक सुतगिरण्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.त्यामुळे आता बॅंकांनी अशा सुतगिरण्या विक्रीस काढल्या आहेत. राज्य सरकारने खासगी व सहकारी सुतगिरण्यांना कमी दरात वीज उपलब्ध करून द्यावी, प्रती चाती तीन हजार रूपये प्रमाणे सरकारने अर्थ सहाय्य करावे,मंदीच्या काळात कापूस खरेदीवर 10 टक्के अनुदान द्यावे.
नाफेडच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारभावत कापूस उपलब्ध करून द्यावा अशा विविध मागण्या ही करण्यात आल्या आहेत. सरकारने या मागण्यांचा विचार करून मदत करावी, अन्यथा 1 जुलै पासून राज्यातील सर्व खासगी व सहकारी 300 सुतगिरण्या बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा खासगी स्पिनिंग मिल असोसिएशने दिला आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.