Sangli News : आज इथं बसलाेय उद्या शरद पवार यांच्या बंगल्यासमाेर बसू; काॅंग्रेस कार्यकर्ते आक्रमक

एका मेळाव्यानंतर काॅंग्रेसच्या हालचाली सुरु झाल्या.
sangli news, congress, ncp office
sangli news, congress, ncp officesaam tv

Sangli News : इस्लामपूर येथे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या पक्ष कार्यालयावरून आता कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. आज एनसीपीच्या कार्यालयासमोर कॉंग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. राष्ट्रवादीने हे कार्यालय सोडून कॉंग्रेसच्या ताब्यात द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली. (Maharashtra News)

sangli news, congress, ncp office
Udayanraje vs Shivendraraje : साता-यात राडा; शिवेंद्रराजेंनतर तेथेच उदयनराजेंनी मारली कुदळ, म्हणाले...

कॉंग्रेसच्या कार्यालयाच्या इमारतीत २४ वर्षांपासून राष्ट्रवादीचे कार्यालय भरते असा कॉंग्रेस नेत्यांकडून आरोप केला जात आहे. महिन्याभरापूर्वी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी इस्लामपूर (islampur) येथे घेतलेल्या एका मेळाव्यात काॅंग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीत या कार्यालयावरून वाद असल्याचे समोर आले.

sangli news, congress, ncp office
International Yoga Day : रामदेव बाबांना पण जमणार नाय... खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या याेगावर नेटिझन्सची झडतीय चर्चा (पाहा व्हिडिओ)

महिनाभर राष्ट्रवादीकडून (ncp) कार्यालय सोडण्याबाबत काहीही हालचाल न झाल्याने आता या जागेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाली. इस्लामपूर मधील याच कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन (aandolan) करून काँग्रेसचे कार्यालय काँग्रेसच्या (congress) ताब्यात द्यावे अशी मागणी केली आहे.

sangli news, congress, ncp office
Udayanraje Bhosale On Sharad Pawar : विश्वासघात... उदयनराजेंनी एका वाक्यात शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्याचा घेतला समाचार

अन्यथा शरद पवार यांच्या बंगल्यासमाेर ठिय्या

चार दिवसांत या बाबतीत राष्ट्रवादीने निर्णय घेतला नाही तर मुंबईत शरद पवारांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलनाला बसू असा इशारा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जिंतेंद्र पाटील आणि विजय पवार (सचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस) यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com