ST Bus Saam Tv
महाराष्ट्र

MSRTC NEWS : एसटी कर्मचाऱ्यांची होणार 'दिवाळी', महामंडळाकडून मिळालं मोठं गिफ्ट

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी मोठं पॅकेज जाहिर करण्यात आलं आहे. राज्य सरकारने 45 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar Channe) यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सरसकट ५ हजार रुपयांची रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Government financial package for st bus employees)

दरम्यान, या पॅकेजचा लाभ जवळपास ८७ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी वर्गाला होणार आहे. दरवर्षी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात दिवाळीची भेट दिली जाते. कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून प्रवासी संखेत घट झाली. त्यामुळं एसटी महामंडळाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संख्या घटल्याने एसटीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही महामंडळाकडून यंदा अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळी भेट म्हणून पाच हजार रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल,असंही चन्ने यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT