Video: भारत-पाकिस्तान महामुकाबला कोण जिंकणार? विराट कोहली, बाबर आझम आणि रिझवानचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकपचा थरार सुरु झाला असून भारत-पाकिस्तानचा महामुकाबला पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. मेलबर्नमध्ये भारत-पाकिस्तानचा (India vs Pakistan) संघ 23 ऑक्टोबरला आमने-सामने येणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतासह पाकिस्तानचे खेळाडू नेट्समध्ये कंबर कसत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही संघाचे खेळाडू एकत्रित सराव करत असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. विराट कोहली, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान एकत्रित सराव करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Virat Kohli net practice with babar azam and mohammad rizwan)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचलेल्या भारतीय संघानं वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) जबरदस्त सुरुवात केली आहे. भारताची पहिली वॉर्म अप मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध झाली. या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. मात्र, चाहत्यांना आता खरी उत्सुकता लागली आहे 23 ऑक्टोबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची.
परंतु, या सामन्याआधी खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी यांच्यात एक वेगळाच माहोल बनताना दिसत आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम नेट्समध्ये एकत्रित सराव करत होते. भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांसोबत सराव करताना क्वचितच दिसतात. कोहलीने वॉर्म अप मॅचमध्ये आक्रमक फलंदाजी केली नाही. त्याने 13 चेंडूत फक्त 19 धावा केल्या.
कदाचित याच कारणामुळं कोहली सामना संपल्यानंतर नेट्समध्ये सराव करण्यासाठी गेला. टीम इंडियाचा सरावाचा काहीच प्लान नव्हता. पण विराट बॅटिंग कोच विक्रम राठोड यांच्यासोबत किट घेवून नेट्समध्ये पोहोचला. याच दरम्यान पाकिस्तान आणि इंग्लंडची टीम नेटमध्ये सराव करत होती.
कोहलीनं 40 मिनिटं नेट प्रॅक्टिस केली
विराट कोहलीनं एका रिकाम्या नेट्समध्ये कसून सराव केला. याचवेळी एका बाजूला बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान सराव करत होते.दुसरीकडे इंग्लंडचे खेळाडूही क्रिकेटचे धडे गिरवत होते. कोहलीनं जवळपास 40 मिनिटं नेटमध्ये सराव केला. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये कोहली, बाबर आणि रिझवान एकत्रित नेटमध्ये सराव करताना दिसत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.