Asia Cup 2023 Jay Shah : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शहा यांनी पाकिस्तानला मोठा दणका दिला. आशिया कप २०२३ साठी टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात स्पर्धेसाठी जाणार नाही, असे जय शहा यांनी स्पष्ट केले. जय शहा यांच्या या विधानानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात खळबळ उडाली असून पाकिस्तानने आता थेट वर्डकप न खेळण्याची धमकी दिली आहे. (Cricket Latest Marathi News)
काय म्हणाले होते जय शहा?
आशिया कप २०२३ या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये (India Vs Pakistan) जाणार असे वृत्त काही प्रसार माध्यमांमध्ये आले होते. या वृत्ताचं जय शहा यांनी खंडण केलं. इतकंच नाही तर भारत जर पाकिस्तानविरुद्ध कोणता सामना खेळणार असेल तर, ते ठिकाण दुसरेच असेल, पाकिस्तान नाही, असे जय शहा यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, जय शहा यांच्या या विधानामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये भूकंप झाला असून आता त्यांनी थेट वर्डकप न खेळण्याची धमकी दिली आहे. पुढच्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये भारत आयसीसीच्या ५० षटकाच्या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे.
त्यामुळे जय शहा यांच्या वक्तव्याचा परिणाम पाकिस्तानमधील आशिया चषक स्पर्धेवर होणार असेल, तर पाकिस्तानही भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार नाही, अशी स्पष्ट धमकी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबत एक निवेदनही जाहीर केलं आहे. 'एसीसीच्या बैठकीत सदस्यांच्या संमतीनंतर पाकिस्तानला आशिया कपचे २०२३ यजमानपद देण्यात आले. जय शाह यांचे विधान ACC च्या बोधवाक्याच्या विरोधात आहे, असं या निवेदनात म्हटलं आहे.
सर्व मंडळांनी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. या विधानामुळे आशियाई आणि आंतरराष्ट्रीय समिती आणि आयसीसी यांच्यात तेढ निर्माण होईल. त्याचवेळी, भारतात होणाऱ्या आयसीसी विश्वचषकावरही त्याचा परिणाम होईल, ज्यामध्ये पाकिस्तानला भाग घ्यायचा आहे. असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.