पानटपरीच्या आड भलताच धंदा; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Versova Police Seize 375 Electronic Cigarettes Worth Rs 5.85 Lakh: वर्सोव्यात पोलिसांची मोठी कारवाई. यारी रोड परिसरातील सिल्वर गेट बिल्डिंगमधून परदेशी कंपन्यांचे ३७५ इलेक्ट्रॉनिक सिगारेट/व्हेप जप्त करण्यात आले असून, त्यांची किंमत सुमारे ५.८५ लाख रुपये आहे. या प्रकरणी पानटपरी चालकाला अटक करण्यात आली आहे.
Versova police seize 375 electronic cigarettes worth Rs 5.85 lakh
Versova police seize 375 electronic cigarettes worth Rs 5.85 lakhsaam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटच्या विक्रीविरोधात वर्सोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वर्सोवा गावातील यारी रोड परिसरात केलेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३७५ व्हेप (इलेक्ट्रॉनिक सिगारेट) जप्त केले असून, त्यांची अंदाजे किंमत ५ लाख ८५ हजार रुपये आहे. या प्रकरणी पानटपरी चालक अहमद बीफफातीमा कबीर (वय ३२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Versova police seize 375 electronic cigarettes worth Rs 5.85 lakh
रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांचा नवा 'झोल'! मीटरमध्ये बसवले गुप्त डिव्हाइस अन् प्रवाशांच्या खिशावर मारला दरोडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक व्यक्ती इलेक्ट्रॉनिक सिगारेट विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा आव्हाड वारे यांना मिळाली. त्यानुसार एटीसी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निवास रोकडे यांना माहितीची शहानिशा करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर एटीसी पथकाने परिसरात गस्त घालत संशयितावर पाळत ठेवली. संशयित अहमद कबीर याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या राहत्या रुम क्रमांक १०१, सिल्वर गेट बिल्डिंग, यारी रोड, वर्सोवा गाव येथे पंचांसमक्ष झडती घेण्यात आली.

Versova police seize 375 electronic cigarettes worth Rs 5.85 lakh
ड्रग्ज तस्कराच्या मुसक्या आवळल्या; मुंबई पोलिसांच्या कारवाईत तब्बल ९ लाखांचा MD जप्त

या झडतीमध्ये विविध परदेशी कंपन्यांचे आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे एकूण ३७५ इलेक्ट्रॉनिक सिगारेट/व्हेप आढळून आले. पोलिसांनी हा संपूर्ण साठा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे ५.८५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२३१/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरोधात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९ मधील कलम ४, ५, ७ तसेच सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ मधील कलम ७(२), ७(३), २० अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

Versova police seize 375 electronic cigarettes worth Rs 5.85 lakh
Mumbai: दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; चौघांना अटक, ८ चोरीच्या बाईक जप्त

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा वारे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक निवास रोकडे आणि एटीसी पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास वर्सोवा पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com