निधीमुळे अडले, आमदार मंत्र्यांसमोरच रडले, निधीवाटपावरून भाजप-शिंदेसेनेत पुन्हा संघर्ष

Mahayuti Crisis: निधीवरून अडवणूक केल्यानं शिंदेसेनेच्या आमदाराला थेट भर कार्यक्रमात मंचावरच रडू कोसळले. आपल्या पक्षाच्या मंत्र्यांसमोर कैफीयत मांडताना हा प्रकार घडला. कोण आहे हा आमदार आणि कोणत्या मंत्र्यासमोर हा आमदार रडला? पाहूयात हा रिपोर्ट ......
MAHAYUTI FUND ROW
MAHAYUTI FUND ROWsaam tv
Published On

भर मंचावर शिंदेंसेनेच्या 2 मंत्र्यांसमोर रडणारे हे आहेत...शिंदेसेनेचे विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी...नंदुरबार जिल्ह्यात शिंदेसेनेच्या मेळाव्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून हा आमदार चंद्राकांत रघुवंशी तक्रार करू लागले आणि त्यांना थेट अश्रू अनावर झाले...शिंदेसेनेच्या आमदारांना असमान निधीवाटप होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी जाहीररित्या केलाय. नेमकं काय म्हणाले ऐका...

जिल्ह्यामध्ये आपल्याच पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या मंत्र्यांकडून आपल्याला असमान आणि अपुरी वागणूक मिळत असल्याची खंत ज्यावेळी आमदार रघुवंशी व्यक्त करत होते... तेव्हा व्यासपीठावर मंत्री उदय सामंत आणि मंत्री गुलाबराव पाटलही उपस्थित होते...त्यामुळे निधीवाटपावरून रघुवंशींना एकीकडे उदय सामंतांनी धीर दिला.. तर दुसरीकडे आम्ही सगळ्यांना निधी देतो, मग नंदुरबार काय पाकिस्तानात आहे का? असा सवाल संतप्त सवाल मंत्री गुलाबराव पाटलांनी केलाय..

नंदुरबार जिल्ह्यामध्ये निधीवाटपावरून उफाळलेला हा वाद आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला अश्रू अनावर झाल्याची ही घटना महायुतीमधील अंतर्गत कुरघोडी आणि गटबाजी चव्हाट्यावर आणणारी ठरलीय.. एकीकडे पक्ष सत्तेत असतानाही आपल्याच हक्काच्या निधीसाठी झगडावे लागत असेल तर महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचंच दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com