Rahul Gandhi News: राम-रावण उल्लेखावरुन राजकारण पेटलं; राहुल गांधींची काँग्रेस नेत्याकडून प्रभु रामाशी तर भाजपकडून रावणाची तुलना

त्रेतायुगातील वनवासात भगवान रामानेही इतका लांब प्रवास केला नव्हता. भगवान राम अयोध्येहून श्रीलंकेला चालत गेले.
Rahul Gandhi
Rahul Gandhisaam tv

जयपूर : काँग्रेस (Congress) नेत्याने राहुल गांधीचं (Rahul Gandhi) कौतुक करताना त्यांची तुलना थेट प्रभू रामाशी केली आहे. तर भाजपने त्यांची तुलना थेट रावणाशी केली आहे. यामुळे सध्या राम-रावणाच्या तुलनेनं राजकारण ढवळून निघालं आहे.

रायस्थानमधील गेहलोत सरकारमधील वैद्यकीय मंत्री परसादी लाल मीना आपल्या या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. ते म्हणाले की, राहुल गांधी प्रभू रामापेक्षा जास्त चालतील. भगवान राम अयोध्येहून श्रीलंकेला पायी गेले होते. राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालत जाणार आहेत.

Rahul Gandhi
Congress New President : मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झाले, त्यांच्यासमोरील आव्हानांची यादी मोठी; काँग्रेससाठी गेमचेंजर ठरणार का?

मीडिया रिपोर्ट्सनुसार मंत्री परसादी लाल मीना यांनी सोमवारी दुपारी 4 वाजता दौसा येथे हे वक्तव्य केले. भारत जोडो यात्रेसाठी त्यांनी राहुल गांधींचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले की, त्रेतायुगातील वनवासात भगवान रामानेही इतका लांब प्रवास केला नव्हता. भगवान राम अयोध्येहून श्रीलंकेला चालत गेले. त्याहीपेक्षा कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत जाणारी राहुल गांधींची ही ऐतिहासिक पदयात्रा आहे. (Latest News Update)

पुढे मंत्री महोदय म्हणाले की, देशात जातीयवादाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यात राहुल गांधी देशाला जोडण्याचे काम करणार आहेत. एवढा लांबचा प्रवास कधीच कुणी केला नाही आणि पुढे कुणीही करु शकणार नाही.

भाजपकडून रावणाशी तुलना

एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधींची तुलना रामाशी करत असताना भाजप खासदार अनिल बोंडे यांनी टीका केली आहे. राहुल गांधी आणि रावणात बरंच साम्य आहे. राहुल गांधींची यात्रा करताना उत्तरेकडून दक्षिणेकडे जात नाहीयेत. दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. या यात्रेत ज्या लोकांनी भारत तोडण्याची शपथ घेतली होती, त्यांच्या गळ्यात गळे घालण्याचं काम ते करत आहेत, अशी अनिल बोंडे यांनी केली आहे.

Rahul Gandhi
Rohit Pawar : आमदार रोहित पवारांच्या अडचणी वाढणार? 'त्या' प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी

नाना पटोलेंकडून राहुल गांधींचं कौतुक

महाराष्ट्र काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी आणि भगवान राम यांची नावे 'रा' ने सुरू होणे हा योगायोग असल्याचे म्हटले आहे. पटोले यांनी मंगळवारी सांगितले की, राहुल गांधी आणि प्रभू राम यांच्या नावाचे पहिले अक्षर 'रा'ने सुरू होणे हा देखील योगायोग आहे. पटोले पुढे म्हणाले की, या योगायोगानंतरही काँग्रेस राहुल गांधींची तुलना प्रभू रामाशी करत नाही. भाजप नेते नेत्यांची तुलना देवाशी करतात. राहुल गांधी हे माणूस असून ते मानवतेसाठी काम करत आहेत, असं पटोले यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com